'या' अभिनेत्रीने एक्स पतीला दिल्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा, म्हणाली...

'या' अभिनेत्रीने एक्स पतीला दिल्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा, म्हणाली...

तिचा हा सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावर प्रतिक्रिया देताना तिने महिलांनी किस करण्यात वाईट काय आहे असा प्रश्नच विचारला.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै- दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलन सध्या तिच्या आगामी आदाई सिनेमातील बोल्ड सीनमुळे चर्चेत आली आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तिचा एक लीप लॉक सीन दाखवण्यात आला आहे. तिचा हा सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावर प्रतिक्रिया देताना अमालाने महिलांनी किस करण्यात वाईट काय आहे असा प्रश्नच विचारला. हे कमी की काय आता तिने एक्स पतीला त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

अमाला पॉलने दिग्दर्शक एएल विजयशी 2014 मध्ये लग्न केलं होतं. मात्र दोघं लग्नाचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. 2016 पासून दोघं वेगळे राहू लागले तर 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. अमालाशी घटस्फोट झाल्यानंतर विजयने चेन्नईत दुसरं लग्न केलं.

एका मुलाखतीत अमालाला विजयच्या दुसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता तिने विजयला लग्नाच्या शुभेच्छा देत हॅपी मॅरिड लाइफ असा संदेशही दिला. अमाला पुढे म्हणाली की, ‘विजय खूप चांगला माणूस आहे. तो खूप गोड आहे. मी मनापासून त्याला लग्नाच्या शुभेच्छा देते आणि दोघांना खूप सारी मुलं होवो अशी प्रार्थनाही करते.’

काय आहे अदाई सिनेमाची कथा-

आदाई हा एक थ्रिलर ड्रामा आहे. रत्ना कुमार दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती विजी सुब्रमनियन, वी स्टूडियोज यांनी केली आहे. 1.44 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये एक त्रासलेली आई तिच्या हरवलेल्या मुलीची तक्रार नोंदवायला पोलीस ठाण्यात जाते. सुरुवातीला पोलीस महिलेकडे दुर्लक्ष करतात. पण नंतर तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांना ती मुलगी एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नग्न अवस्थेत भेटते. अमालाने या सिनेमात याच मुलीची भूमिका साकारली आहे.

‘खतरों के खिलाडी 10’ मध्ये दिसणार मराठीची ही सुपरस्टार अभिनेत्री

पुन्हा लव्ह सीन लीक झाल्यामुळे राधिका आपटे भडकली, म्हणाली....

Bigg Boss Marathi 2- अभिजीत केळकर घरातून गायब, स्पर्धकांना दिला सावधतेचा इशारा

First published: July 17, 2019, 6:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading