• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Amala Paul ने नागार्जुनसोबत लिपलॉक सीन देण्यासाठी ठेवली होती विचित्र अट; निर्मातेदेखील हैराण!

Amala Paul ने नागार्जुनसोबत लिपलॉक सीन देण्यासाठी ठेवली होती विचित्र अट; निर्मातेदेखील हैराण!

ही अट ऐकून चित्रपट निर्माते देखील हैराण झाले होते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये (South States) तेलुगू, तमिळ, मल्याळम या तिथल्या स्थानिक भाषांमधले चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण केले जातात. बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीलाही (South Film Industry) समृद्ध ऐतिहासिक परंपरा असून, तिथले चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला अक्षरशः देव मानतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या काही कलाकारांनी बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं आहे. अशा कलाकारांपैकीच एक आहे तेलुगू सुपरस्टार (Telugu Superstar) नागार्जुन अक्किनेनी (Nagarjun Akkineni). गेली अनेक वर्षं तेलुगू चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या या देखण्या सुपरस्टारने बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक काळ गाजवला आहे. त्याचे अनेक हिंदी चित्रपटही गाजले आहेत. अलीकडेच त्याचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा यांच्या घटस्फोटामुळे नागार्जुन आणि त्याचं कुटुंब चर्चेचा केंद्रबिदू ठरलं होतं. 'बॉलिवूड लाइफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, आता नागार्जुनने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं असून, लवकरच दिग्दर्शक परवीनच्या 'द घोस्ट' (The Ghost) या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर काजल अग्रवाल काम करणार होती; पण काही कारणांमुळे ती हा चित्रपट करू शकली नाही. त्यामुळे काजलच्या जागी निर्मात्यांनी आता अभिनेत्री अमला पॉलला (Amla Paul) करारबद्ध केलं आहे. वयाच्या 17व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अमला पॉलने गेल्या 12 वर्षांत अनेक तमीळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करून चांगलं नाव कमावलं आहे. तिचे बहुतेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. अमला डिजिटल अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रसिद्ध आहे. त्यामुळे नागार्जुनबरोबर तिची या चित्रपटात वर्णी लागली आहे. हे ही वाचा-छोट्या पडद्यावरील सोज्वळ सुनेचा SuperHot अंदाज; सृष्टीनं केलं Topless फोटोशूट या चित्रपटात नागार्जुन आणि अमला पॉल प्रेमी युगुलाची भूमिका साकारणार आहेत. या प्रेमी जोडीतली उत्तम केमिस्ट्री दाखवण्यासाठी दिग्दर्शकाने दोघांमध्ये काही इंटिमेट सीन (Intimate Scene) शूट करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार नागार्जुन आणि अमला पॉल किसिंग (Kissing) आणि काही इंटिमेट सीन करताना दिसतील; मात्र त्यासाठी या अभिनेत्रीने निर्मात्यांसमोर एक विशेष अट ठेवल्याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. ही नेमकी काय अट आहे, याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. या खास सीन्ससाठी अमलाने निर्मात्यांकडून अतिरिक्त मानधनाची मागणी केली असल्याचं 'द घोस्ट'शी संबंधित सूत्रांनी म्हटलं आहे. 'द घोस्ट' चित्रपटाचं चित्रीकरण पुढील 2 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
  First published: