Home /News /entertainment /

साऊथचा सुपरस्टार रामचरणची पत्नी उपासनानं घातलेल्या फ्लोरल पिंक स्कर्टची रंगली चर्चा, किंमत ऐकून बसेल धक्का

साऊथचा सुपरस्टार रामचरणची पत्नी उपासनानं घातलेल्या फ्लोरल पिंक स्कर्टची रंगली चर्चा, किंमत ऐकून बसेल धक्का

upasana kamineni

upasana kamineni

अनेक साऊथ कलाकारांनी (South Actors) त्यांच्या खास अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे रामचरण (Ram Charan). रामचरणचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या त्याची पत्नी उपासना कामिनेनी (Upasana Kamineni) तिच्या स्कर्ट मुळे चर्चेत आली आहे.

पुढे वाचा ...
    वी दिल्ली, 25 मार्च: अनेक साऊथ कलाकारांनी (South Actors) त्यांच्या खास अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे रामचरण (Ram Charan). रामचरणचा मोठा चाहतावर्ग आहे. तो प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा आहे. परंतु त्याने मनोरंजनसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रामचरणचे फक्त साऊथमध्येच नाही तर देशभरात फॅन्स आहेत. रामचरणच्या पत्नीचं नाव उपासना कामिनेनी (Upasana Kamineni) आहे. हे दोघंही सोबत अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. उपासना ही शोभना कामिनेनी आणि अनिल कामिनेनी यांची मोठी मुलगी आहे. ती 'अपोलो लाईफ'ची उपाध्यक्षा आणि 'बी पॉझिटिव्ह मॅगझिन'ची मुख्य संपादक आहे. उपासना ही केवळ एक यशस्वी व्यावसायिक महिलाच नाही तर एक फॅशनिस्टा (fashionista) देखील आहे. तिच्या स्टाईलिश अंदाजाने नेहमीच ती फॅशनिस्टा असल्याचं सिद्ध करते. उपासना कामिनेनीने अलीकडेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिने व्हाईट टॉप आणि पिंक फ्लेर्ड नी लेन्थ स्कर्ट घातला आहे. या ड्रेसमध्ये उपासना खूपच सुंदर दिसत आहे. तिने या ड्रेसवर केस मोकळे सोडले होते आणि न्यूड लिपस्टिकने तिने तिचा मेकअप पूर्ण केला. अगदी कमी आणि साध्याशा मेकअपमध्ये उपासनानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. बॉलिवूड शादी. कॉमने या संदर्भात वृत्त दिलंय. उपासना नेहमीच सुंदर दिसते. या व्हाईट टॉप आणि पिंक स्कर्टमध्ये ती देखणी दिसत होती. परंतु अगदी सिंपल दिसणाऱ्या या स्कर्टची किंमत ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या स्कर्टची किंमत लाखात आहे. कॉटनमध्ये पेस्टल पॅटर्नसह पिंक रंगात तयार केलेला उपासनाचा हा स्कर्ट 'डायर' या ब्रँडचा आहे. तसेच ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्याची किंमत 1,35,154 रुपये आहे.
    दरम्यान, उपासना अनेकदा तिचे कपडे रिपीट करताना दिसते. मला कपडे जपून ठेवायला आणि पुन्हापुन्हा घालायला आवडतं, कारण त्या कपड्यांसोबत आपल्या भावना आणि आठवणी जोडलेल्या असतात, असं एकदा उपासना म्हणाली होती. उपासना आणि रामचरण यांनी 2012 मध्ये लग्न केलं होतं. हे दोघेही सोबत खूप सुंदर दिसतात. रामचरणच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा RRR चित्रपट आज (25 मार्च 22) रिलीज होतोय. कोरोनामुळे या चित्रपटाची तारीख अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, फायनली आज हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतोय. या चित्रपटात रामचरणसोबत ज्युनियर एनटीआर (Jr NTR) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टही (Alia Bhatt) महत्त्वाच्या भूमिकेत असून, ती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.
    First published:

    Tags: Entertainment, South actress

    पुढील बातम्या