#MeToo विंता नंदा प्रकरणात आरोपी आलोक नाथ यांना अग्रिम जामीन

#MeToo विंता नंदा प्रकरणात आरोपी आलोक नाथ यांना अग्रिम जामीन

लेखिका विंता नंदा यांनी केलेल्या बलात्काराच्या आरोपात अडकलेले अभिनेते आलोक नाथ यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, ०५ जानेवारी २०१९- लेखिका विंता नंदा यांनी केलेल्या बलात्काराच्या आरोपातून अभिनेते आलोक नाथ यांना थोडा दिलासा मिळाला आहे. आलोक यांना दिंडोशी सेशन कोर्टाकडून अग्रिम जामीन मिळाला आहे. या प्रकरणी गेल्या २६ डिसेंबरला सुनावणी झाली होती, मात्र कोणताही निर्णय देण्यात आला नव्हता. आता सेशन कोर्टाने आपला निर्णय दिला.

आलोक नाथ यांच्या वकिलांनी १३ डिसेंबरला अग्रिम जामिनासाठी याचिका दाखल केली होती. विंता नंदा यांच्या वकिलांना या याचिकेला कडाडून विरोध केला होता. आलोक यांच्या वकिलांनी विंता यांनी लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले. मात्र यावर परत वार करताना विंता यांच्या वकिलांनी म्हटले की, जर त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत तर ते कायद्या समोर यायला का घाबरत आहेत?

विंता नंदा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट लिहित १९ वर्षांपूर्वी त्यांच्यावर आलोक नाथ यांनी बलात्कार केला असा आरोप केला होता. मात्र आलोक यांनी हे आरोप नाकारत, विंता यांच्यावर मानहानीचा खटलाही दाखल केला होता. विंता यांनी आलोक यांच्यावर त्यांना मद्यधुंद करत त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. पोलीस तक्रारीनंतर २१ नोव्हेंबरला पोलिसांनी आलोक नाथ यांच्याविरुद्ध बलात्काराचा खटला दाखल केला होता.

VIDEO : राज ठाकरे मोदींना टाळून राहुल गांधींना देणार का मुलाच्या लग्नाची पत्रिका?

First published: January 5, 2019, 2:43 PM IST

ताज्या बातम्या