Home /News /entertainment /

'पुष्पा द राईज' चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड, बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई

'पुष्पा द राईज' चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड, बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई

Pushpa: The Rise

Pushpa: The Rise

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun) याचा 'पुष्पा द राईज'(Pushpa: The Rise) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.

    नवी दिल्ली, 20 डिसेंबर: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun) याचा 'पुष्पा द राईज'(Pushpa: The Rise) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांची जबरदस्त अशी कमाई केली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. दक्षिणेचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun)आणि रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा द राईज' हा सिनेमा 17 डिसेंबर रोजी रिलीज झाला. त्याआधी या सिनेमाचे प्रमोशन मुंबईत झाले. रिपोर्टनुसार सिनेमाने तमिळनाडुमध्ये पहिल्या दिवशी 4.06 कोटी रुपयांची कमाई केली. रणवीर सिंहच्या ’83’ या सिनेमामुळे ‘पुष्पा’सिनेमाच्या मेकर्सने चित्रपट लवकर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. तेलंगणामध्ये सिनेमाने 11 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. पुष्पा: द राइज हा पॅन इंडियाचा सर्वाधिक मोठा प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे. सिनेमा पाच विविध भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. याची निर्मिती दोन भागात करण्यात आली आहे. सिनेमाची कथा आंध्र प्रदेशातील शेषचलम क्षेत्रातील लाल चंदन तस्करांच्या आयुष्यावर आधारित आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने रजनीकांत, अक्षय कुमार, थालापति विजय यांसारख्या सुपरस्टार चित्रपटांना मागे टाकले आहे. 'स्पायडरमॅन नो वे होम कलेक्शन डे' ने ओपनिंगमध्ये 41.50 कोटी रुपयांची कमाई केली. आणि विजय सेतुपती-थलपथी विजय अभिनीत 'मास्टर'ने 40 कोटी रुपये कमावले आहेत. . दुसरीकडे, जर आपण रजनीकांत आणि नयनतारा स्टारर 'अन्नाथे' बद्दल बोललो, ज्यांना सिनेमाचे देव म्हटले जाते, तर त्याने 34.70 कोटींची कमाई केली होती, तर अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ने पहिल्या दिवशी 31.40 कोटींची कमाई केली होती. सुकुमार दिग्दर्शित पुष्पा या चित्रपटाने या वर्षातील या सर्व सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर नवे स्थान मिळवले आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Allu arjun

    पुढील बातम्या