Home /News /entertainment /

'वडापाव सारखा दिसतोय'; 'पुष्पा 2' वरुन अल्लू अर्जुन ट्रोल, पाहा फोटो!

'वडापाव सारखा दिसतोय'; 'पुष्पा 2' वरुन अल्लू अर्जुन ट्रोल, पाहा फोटो!

अल्लू अर्जुन मुंबईत होता तेव्हाचे त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर गराळा घालत आहेत.

  मुंबई, 26 जून : 'पुष्पा' (pushpa movie)चित्रपटानं संपूर्ण भारताला वेड लावलेलं पहायला मिळालं. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun)आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (rashmika mandhana)यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा'नं रेकाॅर्डब्रेक कमाई केली. चित्रपटातील हटके स्टाईल, गाणी, लूक, अभिनय याच्यामुळे चाहत्यांनी चित्रपटाला डोक्यावर घेतलं. पुष्पा चित्रपटाला मिळालेलं अफाट प्रेम पाहता चित्रपटाचा लवकरच दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर 'पुष्पा 2' विषयी चर्चा होत असते. अशातच अल्लू अर्जुनचा एक फोटो व्हायरल (allu arjun look viral) होत आहे. त्यामुळे हा फोटो 'पुष्पा 2' च्या (Pushpa 2)लूकचा असावा, असा तर्क नेटकऱ्यांनी लावला आहे. हेही वाचा - Kushal Badrike: बापरे! कुशल बद्रिकेने dummy न वापरता केले खतरनाक स्टंट, पाहा video अल्लू अर्जुन मुंबईत होता तेव्हाचे त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर गराळा घालत आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये अल्लू लठ्ठ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे हा पुष्पा 2 मधला लूक तर नाही ना?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेकांनी कमेंटमध्ये त्याला लठ्ठपणामुळे ट्रोलही केलं आहे. एकाने त्यांचे वर्णन मुंबईतील प्रसिद्ध वडापावशी केलं आहे. वडापाव सारखा दिसतोय असं म्हटलं आहे. फोटोंवर अनेक प्रकारच्या कमेंटचा वर्षाव होत आहे.
  दक्षिणेतील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक असलेल्या अल्लू अर्जुन पुष्पाच्या सुपरहिटनंतर हिंदीमध्येही स्टार दर्जा राखण्यास सुरुवात झाली आहे. अल्लू सध्या पुष्पा 2 च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप यावर काही अधिकृत अशी घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्या व्हायरल होणारा अल्लू अर्जुनचा लूक नक्की कोणत्या चित्रपटासाठी आहे याविषयी गूढ कायम आहे. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अफाट यशानंतर अल्लू अर्जुनची बॉलिवूडमधील लोकप्रियता गगनाला भिडली आहे. पहिल्यापेक्षा त्याचा चाहतावर्ग आणखीनच वाढला आहे. त्यामुळे चाहते सध्या त्याच्या पुष्पा 2 च्या प्रतिक्षेत आहेत. या चित्रपटाची कधी एकदा अधिकृत घोषणा होतीये याकडे चाहत्यांच्या नजरा आहेत.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Allu arjun, Bollywood, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या