Home /News /entertainment /

Pushpa च्या यशानंतर अल्लू अर्जुनचा भाव गगनाला भिडला! पुढच्या सिनेमासाठी मिळालेल्या ऑफरचा आकडा पाहून डोळे विस्फारतील

Pushpa च्या यशानंतर अल्लू अर्जुनचा भाव गगनाला भिडला! पुढच्या सिनेमासाठी मिळालेल्या ऑफरचा आकडा पाहून डोळे विस्फारतील

पुष्पाच्या सुपरडुपर यशानंतर अल्लू अर्जुनला नव्या सिनेमासाठी किती कोटींची ऑफर आली आहे पाहा... बॉलिवूडच्या मेगा स्टार्सनाही टाकलंय मागे. कुणाच्या सिनेमात दिसणार Allu Arjun?

मुंबई, 24 जानेवारी: सध्या देशभरात सगळीकडे अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटाची चर्चा आहे. दाक्षिणात्यच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही या चित्रपटानं तुफान यश मिळवलं असून, अल्लू अर्जुनच्या प्रसिद्धीचा डंका सर्वत्र गाजत आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने 300 कोटी रुपयांहून (Pushpa Box office collection) अधिक व्यवसाय केल्यानं अल्लू अर्जुनचा समावेश सुपरस्टार रजनीकांत, प्रभास आणि थलपथी विजय यांच्या 100 कोटींच्या क्लबमध्ये झाला आहे. त्याचे चाहते त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अॅटलीच्या आगामी चित्रपटात अल्लू अर्जुन दिसणार आहे. 'टीव्ही9'नं दिलेल्या वृत्तानुसार, लायका प्रॉडक्शननं (Lyca Production) अल्लू अर्जुनला या नव्या चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपये देऊ केले असल्याची चर्चा आहे. 'पुष्पा'साठी त्याला 75 कोटी रुपये मिळाले होते. अल्लू अर्जुन आणि अॅटली यांची नव्या चित्रपटासाठी एक बैठकही झाली असल्याचं समजतं; मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पिंक व्हिलाने यासंदर्भात बातमी दिली आहे. 'पुष्पा' चित्रपटात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि फहाद फासिलदेखील (Fahad Fasil) आहेत. पुष्पाचा पहिला भाग 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातल्या गाण्यांपासून जबरदस्त डायलॉग्जपर्यंत सर्वच बाबींनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. प्रेक्षक याच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत असून, 'पुष्पा : द रूल'नावानं हा सिक्वेल येणार आहे. अल्लू अर्जुन याच्या तयारीत व्यग्र असून, मार्चमध्ये शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. Pushpa फेम रश्मिकाने प्रमोशनसाठी नेसलेल्या या साडीची किंमत वाचून बसेल धक्का दरम्यान, अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी, हिंदीतला 'आला वैकुंठपुररामुलू' चित्रपट चित्रपटगृहाऐवजी 6 फेब्रुवारी रोजी ढिंचॅक टीव्ही या चॅनलवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती गोल्डमाइन्स टेलिफिल्म्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे. VIDEO: तृप्ती देसाईंना देखील आवरला नाही 'पुष्पा'चा मोह!, नणंदेसोबत धरला ठेका दिग्दर्शक अॅटली सध्या नयनतारा, शाहरूख खान आणि प्रियामणीसोबत त्याच्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र असून, त्यांचं पुण्यातलं शेड्यूल पूर्ण झालं आहे. दुसरं शेड्युल सुरू होण्याची तयारीही झाली आहे.
First published:

Tags: Allu arjun, South film

पुढील बातम्या