Home /News /entertainment /

Allu Arjun च्या Pushpa 2 ची प्रदर्शनाआधीच हवा! बड्या प्रोडक्शन हाऊसने दिली 400 कोटींची ऑफर

Allu Arjun च्या Pushpa 2 ची प्रदर्शनाआधीच हवा! बड्या प्रोडक्शन हाऊसने दिली 400 कोटींची ऑफर

allu arjun pushpa

allu arjun pushpa

पुष्पाच्या मोठ्या यशानंतर आता चाहत्यांना पुष्पाच्या दुसऱ्या भागाची (Pushpa 2) ची प्रतीक्षा आहे. पुष्पा 2 कधी येणार याबाबत चाहते उत्सुक असतानाच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

  मुंबई, 17 मार्च: यावर्षी दमदार मुव्हीजबाबत बोलायचं झालं तर 'पुष्पा-द राइज' (Pushpa: The Rise) ची धूम सर्वत्र पाहायला मिळाली. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंधाना (Allu Arjun and Rashmika Mandhanna Pushpa) स्टारर हा सिनेमा, त्यातील डायलॉग्स, गाणी देशातच नाही तर परदेशातही हिट ठरली. या गाण्यांच्या इन्स्टाग्राम रील्सना तर उधाण आले होते. दरम्यान पुष्पाच्या मोठ्या यशानंतर आता चाहत्यांना पुष्पाच्या दुसऱ्या भागाची (Pushpa 2) ची प्रतीक्षा आहे. पुष्पा 2 कधी येणार याबाबत चाहते उत्सुक असतानाच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुष्पाच्या यशानंतर अल्लू अर्जुन आणि रश्मिका पॅन इंडिया स्टार बनले आहेत. या सिनेमासाठी चाहत्यांचं असलेलं वेड लक्षात घेता पुष्पा 2 देखील अशीच जादू करेल असा अंदाज बांधण्यात येत आहे. दरम्यान रिपोर्ट्सनुसार पुष्पा 2 च्या प्रदर्शनासाठी मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये स्पर्धा लागली आहे आणि ते याकरता कोट्यवधींची रक्कम मोजण्यासाठीही तयार आहेत. हे वाचा-अभिनेत्रीने फेकून मारलेला ग्लास चुकून लागला...पोस्टवर थक्क करणाऱ्या कमेंट अशी माहिती मिळते आहे की, एका मोठ्या कॉर्पोरेट प्रोडक्शन हाऊसने पुष्पाच्या मेकर्सना मोठी डील ऑफर केली आहे. हे प्रोडक्शन हाऊन उत्तरेकडील आहे. त्यांनी पुष्पाच्या मेकर्सना चित्रपट प्रत्येक भाषेत प्रदर्शित करण्यासाठी थिएट्रिकल राइट्ससाठी जवळपास 400 कोटींची ऑफर दिली आहे. यामध्ये ओटीटी आणि सॅटेलाइट राइट्सचा समावेश नाही आहे. मात्र अशी शक्यता आहे की मेकर्स ही ऑफर स्विकारणार नाहीत, डीएनएने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.
  दरम्यान या सिनेमाच्या मेकर्सना असा विश्वास आहे की पुष्पा 2 देखील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करेल. हा पार्ट देखील पहिल्याप्रमाणेच ग्रँड असणार आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटींपेक्षा अधिकची जबरदस्त कमाई केली होती. मेकर्सना दुसऱ्या भागाकडून देखील अशाच अपेक्षा असणार आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Allu arjun, Rashmika mandanna, South actress, South film

  पुढील बातम्या