Home /News /entertainment /

VIDEO: 'माझे जे काही पैसे येतात ते थेट.....' स्वप्नील जोशीने केला आश्चर्यकारक खुलासा

VIDEO: 'माझे जे काही पैसे येतात ते थेट.....' स्वप्नील जोशीने केला आश्चर्यकारक खुलासा

स्वप्नील जोशी सध्या 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) या मालिकेत काम करत आहे. या मालिकेच्या टीमने नुकतंच 'मसालेदार किचन कल्लाकार' (Masaledar Kitchen Kallakar) या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

  मुंबई, 30 मार्च-  मराठी मनोरंजन   (Marathi INdustry)  सृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता स्वप्नील जोशीला (Swapnil Joshi)  ओळखलं जातं. स्वप्नीलने अनेक रोमँटिक,थ्रिलर आणि कॉमेडी चित्रपट, वेबसीरीज आणि मालिकांमध्ये काम करत आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. मराठीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी तो एक आहे. सध्या तो झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी'   (Tu Tevha Tashi)  या मालिकेत काम करत आहे. या मालिकेच्या टीमने नुकतंच 'मसालेदार किचन कल्लाकार'   (Masaledar Kitchen Kallakar)   या कार्यक्रमात हजेरी लावली होती. झी मराठीवर 'मसालेदार किचन कल्लाकार' हा शो प्रसारित केला जातो. यापूर्वी 'किचन कल्लाकार' या नावाने हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. कार्यक्रमाची लोकप्रियता पाहून या शोचा दुसरा भाग 'मसालेदार किचन कल्लाकार' सुरु करण्यात आला आहे. या शोमध्ये कलाकार, खेळाडूपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेक सेलिब्रेटी उपस्थिती लावतात. या ठिकाणी चविष्ट पारंपरिक पदार्थांसोबतच गप्पांची खिचडीसुद्धा शिजते. या निमित्ताने प्रेक्षकांना कलाकरांच्या खाजगी आयुष्याबद्दल माहिती नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायला मिळतात. नुकतंच या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये 'तू तेव्हा तशी' या मालिकेतील कलाकारांनी उपस्थिती लावली आहे. पदार्थ बनवण्यासोबतच स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर, अभिज्ञा भावे हे कलाकार धम्माल करताना दिसून येत आहेत. दरम्यान स्वप्नील जोशीने आपल्याबद्दल एक अशी गोष्ट सांगितली जी ऐकून सर्वच कलाकार आणि प्रेक्षक थक्क झाले आहेत.
  या प्रोमोमध्ये कलाकार खरं की खोटं हा विनोदी खेळ खेळत असतात. दरम्यान स्वप्नील जोशीबद्दल कलाकारांना एक प्रश्न विचारण्यात येतो. यामध्ये विचारलेलं असतं की, स्वप्नील जोशी खूप उधळपट्टी करतो हे खरं कि खोटं ओळखायचं होतं. याच प्रश्नाचं स्पष्टीकरण देत स्वप्नील म्हणतो, ''हे खोटं आहे. कारण माझा सगळा पगार मी माझ्या आईबाबांना देतो. मला आजही आईबाबांकडून पॉकेटमनी मिळतो. मला त्या पैशांमध्येच खर्च करावा लागतो. आणि केलेल्या खर्चाचा हिशोब आईबाबानां द्यावा लागतो. जर मी महिन्याअखेर खर्च सांगितला नाही तर मला पुढची पॉकेटमनी मिळत नाही. उरलेल्या पैशांमध्ये मला महिना काढावा लागतो'.स्वप्नीलचं हे उत्तर ऐकून सर्वच थक्क होतात. दुसरीकडे चाहते स्वप्नीलचं कौतुक करत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee Marathi

  पुढील बातम्या