मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचा हा चेहरा

स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार ऑलमोस्ट सुफळ संपूर्णचा हा चेहरा

स्टार प्रवाह (StarPravah) वाहिनीवर अबोली (aboli) ही नवी मालिका 23नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे.

स्टार प्रवाह (StarPravah) वाहिनीवर अबोली (aboli) ही नवी मालिका 23नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे.

स्टार प्रवाह (StarPravah) वाहिनीवर अबोली (aboli) ही नवी मालिका 23नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे.

मुंबई, 10 नोव्हेंबर- स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर अबोली (aboli) ही नवी मालिका 23नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे. या मालिकेत अबोलीची भू्मिका कोण साकरणार याची उत्सुकता सर्वांना होती. अबोलीची मुख्य भूमिका मराठमोळी अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही साकारणारा आहे. गौरी कुलकर्णीने (gauri kulkarni) यापूर्वी 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मध्ये सईची भूमिका साकारली होती. या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार  आहे. ती अबोलीची भूमिका साकारणार  आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो देखील समोर आला आहे.

या मालिकेचा प्रोमो देखील शेअर केली आहे.  यामध्ये ती अबोलीच्या भूमिकेत दिसत आहे. बोलताना ती अडकळताना दिसत आहे. मालिकेची कथा अबोली भोवती आहे.  यासोबतच या मालिकेत अभिनेत्री सुरभी हांडे (Surabhi hande)दिसणार आहे. अभिनेता सचित पाटील देखील छोट्या पडद्यावर या मालिकेमधून पुनरागमन करत आहे. तो मालिकेत इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तो छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच खाकी वर्दीत दिसणार असून त्यासाठी तो उत्साहित त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.या मालिकेच्या कथानकवरून व यातील कलाकारांमुळे मालिकेमबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता लागली आहे.

अबोली मालिकेत तगडी स्टारकास्ट घेण्यात आली आहे. त्यामुळे मालिका पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. यासोबतच आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक आहेत.

वाचा :ही मराठमोळी अभिनेत्री झळकणार मिताली राजच्या बायोपिकमध्ये

गौरी कुलकर्णी मूळची अहमदनगरची

गौरी कुलकर्णी मूळची अहमदनगरची आहे. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण अहमदनगरमधून झाले आहे.पदवीचे पुढचे शिक्षण घेत असलेली गौरी कथ्थक नृत्य कलेत पारंगत असून कॉलेज स्पर्धांमध्ये तिला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.2017 साली आलेल्या 'रंजन' चित्रपटातून गौरीने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे कथानक गावातील प्रेम कथेवर आधारीत होते.गौरी कुलकर्णीला वाचनाची आवड आहे. मालिकेच्या सेटवर गौरी जवळ नेहमीच एखादे पुस्तक असते. चित्रीकरणातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर ती वाचनात वेळ घालवते.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment