अलका कुबल-आठल्येंची मुलगी झाली पायलट !

अभिनेत्री अलका आणि समीर आठल्ये यांची मुलगी इशानी आठल्ये हीने करिअरचा वेगळा मार्ग निवडत वैमानिक झाली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2017 11:32 PM IST

अलका कुबल-आठल्येंची मुलगी झाली पायलट !

06 जून :  आपल्या पाल्याने आपल्यासारखं करिअर करावं अशी सगळ्याचं पालकांची सापेक्षा अपेक्षा असते. त्यातच जर अभिनेते-अभिनेत्री असेल तर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकवं असं समीकरण जुळलेलं असतं पण 'माहेरची साडी' फेम अलका कुबल यांची कन्या इशानी आठल्ये हीन आईचा पावलावर पाऊल न टाकता आपलं 'आकाश' स्वत: निर्माण केलंय.

अभिनेत्री अलका आणि समीर आठल्ये यांची मुलगी इशानी आठल्ये हीने करिअरचा वेगळा मार्ग निवडत वैमानिक झाली आहे. इशानीने व्यावसायिक वैमानिकाचा परवाना नुकताच मिळवलाय.

इशानीने लहानपणापासून वैमानिक होण्याचं ध्येय मनाशी बाळगलं होतं. आई अलका आणि वडील समीर यांनी भक्कम पाठराखण करत आपल्या या लाडक्या लेकीचं स्वप्न सत्यात उतरवलंय.

इशानीने 2015 सालीच अमेरिकेत व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवला होता. पण भारतात तिला मिळाला नव्हता. अखेर तीने इथं येऊन परीक्षा देऊन वैमानिकाचा परवाना मिळवलाय. तिच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2017 11:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...