मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अलका कुबलसह कलाकारांना 10 लाखांचा दणका; नेमकं प्रकरण काय?

वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अलका कुबलसह कलाकारांना 10 लाखांचा दणका; नेमकं प्रकरण काय?

अलका कुबल

अलका कुबल

कलाकारांना येत्या सहा आठवड्यात 10 लाखांची रक्कम त्यांना न्यायालयात जमा करावे लागणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 24 सप्टेंबर : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अलका कुबल यांचा कालच वाढदिवस झाला. मात्र वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अलका कुबल यांच्यासह चित्रपट महामंडळाच्या माजी अध्यक्षांना मोठा दणका देण्यात आला आहे.   पुणे महामंडळाच्या वतीने मानाचा मुजरा या सांस्कृतिक कार्यक्रमात अनावश्यक आणि बोगस खर्च केल्या प्रकरणी 10 लाख रुपये न्यायालयात भरण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने अखिल भारतीय चित्रपट मंडळाच्या आजी व माजी पदाधिकारी तसेच संचालकांना दिला आहे. यात माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, अलका कुबल आणि प्रिया बेर्डे यांचा समावेश आहे. येत्या सहा आठवड्यात 10 लाखांची रक्कम त्यांना न्यायालयात जमा करावे लागणार आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अखिल भारतीय चित्रपट महामंडाळाच्या वतीनं 2012-13मध्ये पुण्यात मानाचा मुजरा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी 52 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालिन संचालकांनी बोगस खर्च दाखवून रक्कम लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी 10 लाख 78 हजार रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा - Alka Kubal B'day: 'हा' आहे अलका कुबल यांचा वीक पॉईंट; ज्येष्ठ अभिनेत्रीने स्वतः केलाय खुलासा

त्याचप्रमाणे मानाचा मुजरा या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या या खर्चाला सर्वसाधारण सभेत मान्यता मागितली होती मात्र सभासदांनी या खर्चावर आक्षेप घेतला होता. कार्यक्रमासाठी जो खर्च केला आहे तो चुकीच्या पद्धतीने केला आहे आणि त्याची वसुली झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.

खरंतर 10 लाख रुपयांची रक्कम भरण्याचा या आदेशावर संबंधित संचालकांनी हाय कोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनवणी करून याचिका फेटाळण्यात आली सहा आठवड्याच्या आत रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  त्याचप्रमाणे रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यानं महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अनेक संचालकांचे सभासदत्त्व देखील रद्द केलं आहे.

ही रक्कम भरण्यासाठी चित्रपट महामंडळाच्या एकूण 15 सदस्यांची नावं आहेत. ज्यात माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय कोंडके. विजय पाटकर. सतीश बिडकर,  मिलिंद अष्टेकर, सुभाष भुरके, अलका कुबल, प्रिया बेर्डे, अनिल निकम, संजीव नाईक, सतीश रणदिे. इम्पियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती, रवींद्र बोरगावकर यांचा समावेश आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment