मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया-रणबीरच्या प्री वेडींग फंक्शन्सना आजपासून सुरुवात, पार पडणार गणेश पूजा-मेहंदी

आलिया-रणबीरच्या प्री वेडींग फंक्शन्सना आजपासून सुरुवात, पार पडणार गणेश पूजा-मेहंदी

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा सध्या रणबीर कपूर   (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्ट  (Alia Bhatt) यांच्या लग्नाबाबत होत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 13 एप्रिल-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा सध्या रणबीर कपूर   (Ranbir Kapoor)  आणि आलिया भट्ट  (Alia Bhatt) यांच्या लग्नाबाबत होत आहे. या दोघांनी अधिकृतपणे आपल्या लग्नाची   (Ranbir-Alia Wedding)  तारीख उघड केलेली नाहीय. त्यामुळे त्यांच्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. पण रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी, तिचा पती भरत साहनी आणि भाची समायरा यांच्या मुंबई आगमनाने पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाचे ठाम संकेत दिले आहेत.

आलिया-रणबीरच्या लग्नाची तारीख जाहीर झालेली नसली तरी लग्नाची जोरदार तयारी दिसून येत आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांनी या लग्नावर मौन बाळगले आहे. परंतु त्यांच्या घरी सुरु असलेली लगबग आणि तयारी पाहून चाहत्यांना विश्वास बसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, असं म्हटलं जात आहे की, रणबीर कपूर-आलिया भट्टच्या प्री वेडिंग फंक्शन्सला आजपासून सुरू होणार आहेत आणि हे प्री वेडिंग फंक्शन्स रणबीर कपूरच्या 'वास्तू' या निवासस्थानी होणार आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. या लव्ह बर्ड्ससोबतच दोन्ही कुटुंबे लग्नाबाबत बोलण्यास तयार नाहीत. मात्र दररोज यासंदर्भातील काही ना काही अपडेट्स नक्कीच समोर येत आहेत. आता रणबीर कपूर-आलिया भट्टच्या लग्नाआधीच्या फंक्शन्सची बातमी आहे, जी आजपासून सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सवरनुसार सांगायचं तर, आजपासून म्हणजेच 13 एप्रिलपासून आलिया आणि रणबीर यांच्या लग्ना आधीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. 13 एप्रिल रोजी सकाळी 11:00 वाजता 'वास्तू'मध्ये गणेश पूजन होणार असून या शुभ कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजेने होणार आहे. यानंतर दुपारी मेहंदीचा कार्यक्रमही होणार आहे. हे सर्व कार्यक्रम फक्त 'वास्तू'मध्येच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. गणेश पूजन आणि मेहंदी फंक्शन्ससोबतच जवळच्या मित्रांसाठी कॉकटेल पार्टीचेही आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कृष्णा राज बंगल्यात ही पार्टी होणार असल्याचं समोर येत आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor