मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: गिफ्ट म्हणून सुरतच्या व्यापाऱ्याने असं काय दिलं? की,मालामाल झाले रणबीर-आलिया

VIDEO: गिफ्ट म्हणून सुरतच्या व्यापाऱ्याने असं काय दिलं? की,मालामाल झाले रणबीर-आलिया

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री आलिया भट्ट   (Alia Bhatt)  आणि रणबीर कपूर  (Ranbir Kapoor)  यांच्या लग्नाचे   (Wedding)  फंक्शन्स सुरू होताच भेटवस्तूही मिळत आहेत. मेहंदी सोहळ्यासोबतच बुधवार, 13 एप्रिलपासून आलिया-रणबीरच्या लग्ना आधीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. रणबीर-आलिया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नाबाबत मौन बाळगले होते. काल रणबीरची आई आणि बहिणीने अखेर खुलासा करत लग्न आज असल्याचं उघड केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 एप्रिल- बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री आलिया भट्ट   (Alia Bhatt)  आणि रणबीर कपूर  (Ranbir Kapoor)  यांच्या लग्नाचे   (Wedding)  फंक्शन्स सुरू होताच भेटवस्तूही मिळत आहेत. मेहंदी सोहळ्यासोबतच बुधवार, 13 एप्रिलपासून आलिया-रणबीरच्या लग्ना आधीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. रणबीर-आलिया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नाबाबत मौन बाळगले होते. काल रणबीरची आई आणि बहिणीने अखेर खुलासा करत लग्न आज असल्याचं उघड केलं आहे. दरम्यान प्रत्येक वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील लोक आहेत ज्यांना बॉलिवूडची ही प्रसिद्ध जोडी पसंत आहे. त्यामुळेच सुरतच्या एका ज्वेलर्सने आपल्या आवडत्या स्टार्सना खास वेडिंग गिफ्ट पाठवले आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुण रणबीर कपूर आणि आलिया भट्टसाठी लग्नाचं गिफ्ट घेऊन आल्याचे दिसत आहे. त्यांच्या हातात पांढऱ्या पारदर्शक कागदामध्ये गुंडाळलेला एक जड पुष्पगुच्छ आहे. हा पुष्पगुच्छ सामान्य फुलांचा नसून विशेष पुष्पगुच्छ आहे. हा पुष्पगुच्छ सोन्याचा असल्याचा दावा त्या तरुणांनी केला आहे. या पुष्पगुच्छाची फुले आणि पाने सोन्याच्या फॉइलपासून बनवलेली आहेत आणि 100% टक्के खरी आहेत. हा इतका मोठा सोन्याचा पुष्पगुच्छ सुरतच्या एका ज्वेलर्सने लग्नासाठी भेट म्हणून पाठवला आहे.

काल आलिया आणि रणबीर या दोघांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लग्नासाठी आलिया-रणबीरचं घर सजवलं जात होतं. विविध तयारी सुरु असल्याचं दिसत होतं. काल या लव्ह बर्ड्सचा मेहंदी सोहळा पार पडला. या लग्ना आधीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कुटुंबीयांनीसुद्धा जबरदस्त एन्ट्री घेतली होती. रणबीर कपूरची आई नीतू कपूर आपली नात, आणि मुलगी रिद्धिमासोबत मुलाच्या घरी पोहोचली होती. सोबतच करिश्मा, करिनासह त्यांची आत्ती रीमा जैनसुद्धा उपस्थित होती.

तर दुसरीकडे आलियाच्या घरातून आई सोनी राजदान, बहीण, शाहीन भट्ट, सावत्र बहीण पूजा भट्ट, वडील महेश भट्ट, अनुष्का रंजन, आकांक्षा रंजनसह इतर मैत्रिणीही सहभागी झाल्या होत्या. तसेच बॉलिवूडमधून अयान मुखर्जी, करण जोहर यांनीही अगदी पारंपरिक अंदाजात एन्ट्री घेतली होती.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Ranbir kapoor