मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Ranbir Wedding : रणबीर- आलियावर मराठी सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव, फोटो पोस्ट करत व्यक्त केलं प्रेम!

Alia Ranbir Wedding : रणबीर- आलियावर मराठी सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव, फोटो पोस्ट करत व्यक्त केलं प्रेम!

आलिया भट्ट ( Alia Bhatt) आणि रणबीर कपूर या क्यूट कपलवर  चाहत्यांसह बॉलिवूड सेलेब्स यांच्याकडून सध्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. यामध्ये मराठी कलाकार देखील मागे नाहीत.

आलिया भट्ट ( Alia Bhatt) आणि रणबीर कपूर या क्यूट कपलवर चाहत्यांसह बॉलिवूड सेलेब्स यांच्याकडून सध्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. यामध्ये मराठी कलाकार देखील मागे नाहीत.

आलिया भट्ट ( Alia Bhatt) आणि रणबीर कपूर या क्यूट कपलवर चाहत्यांसह बॉलिवूड सेलेब्स यांच्याकडून सध्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. यामध्ये मराठी कलाकार देखील मागे नाहीत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 14 एप्रिल- Alia Ranbir Wedding : आलिया भट्ट ( Alia Bhatt) आणि रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) आज, 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आयुष भरासाठी एकमेकांचा हात हातात घेतला आहे. दोघांचा लग्नसोहळा मुंबईत थाटात पार पडला. या दोघांचे लग्नाचे काही फोटो ( Alia Ranbir Wedding Photos )देखील समोर आले आहेत. या क्यूट कपलवर  चाहत्यांसह बॉलिवूड सेलेब्स यांच्याकडून सध्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. यामध्ये मराठी कलाकार देखील मागे नाहीत. विकास पाटील, प्रार्थना बेहेरे, अभिज्ञा भावे, ऋता दूर्गुळे या कलाकारांनी रणबीर आणि आलियाला लग्नाच्या शुभेच्छा देत प्रेम व्यकत केलं आहे.

मन उडू उडू झालं फेम अभिनेत्री ऋता दूर्गुळे हिनं रणबीर कपूर आणि आलियाचा लग्नातील सुंदर फोटो इन्स्टा स्टोरीला शेअर करत या स्वीट जोडीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं म्हटलं आहे की, फक्त प्रेम आणि प्रेम...तू तेव्हा तशी फेम अभिज्ञा भावेने देखील तिच्या इन्स्टा स्टोरीला रणबीर कपूर आणि आलियाचा लग्नातील सुंदर फोटो करत म्हटलं आहे की, हा फोटो पाहून मला खूप आनंद झाला आहे.

बिग बॉस मराठी फेम अभिनेता विकास पाटीलनं रणबीर आलियाला इन्स्टाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीर आणि आलियाचा फोटो शेअर करत त्यावर हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत.

माझी तुझी रेशीमगाठ फेम प्रार्थना बेहेरे हिनं देखील आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, मला ही जोडी खूप आवडते...

मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनघाई पाहण्यास मिळत आहे. विकी कतरिनानंतर आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी आज मुंबईत लग्नगाठ बांधल्याचे समोर आलं आहे. पिंकव्हिलानं याबद्दल वृत्त दिलं आहे. आलिया आता कपूर घराण्याची सूनबाई झाली आहे.  या लग्नाला कुटुंबातील व्यक्तींसह अनेका बॉलिवूड सेलेब्संनी हजेरी लावली. यावेळी करीना कपूर, करिश्मा कपूर, पूजा भट्ट, आकाश अंबानी, करण जोहर  यांसह अनेक  कलाकार उपस्थित होते.

वाचा-Ranbir kapoor-Alia bhatt wedding pic: क्यूट कपल आलिया-रणबीरच्या रॉयल लुकनं वेधलं लक्ष, प्रेमाच्या रंगात रंगून गेले दोघं!

आलियानं लग्नाच्या सुंदर क्षणांचे काही फोटो इन्स्टावर शेअर करत म्हटलं आहे की, आज, एकत्र कुटुंब, मित्रपरिवार यांनी सगळं घर कसं अगदी भरुन गेलं होतं. आमची आवडती जागा ज्या बाल्कनीत आम्ही आमच्या नात्याची पाच वर्ष एकत्र घालवली...आम्ही लग्न केलं. आता नव्या आठवणी जोडण्यासाठी आम्ही अधिक काळ वाट पाहू शकत नाही. अशा आठवणी ज्या प्रेम, हास्य, शांतता, मुव्ही नाईट, वेड्यासारखे वाद. आमच्या आयुष्यातील या खूप महत्त्वाच्या दिवशी आमच्यावर प्रेम आणि आशिर्वादाचा वर्षाव करण्यासाठी मनापासून धन्यवाद. या क्षणांना आणखी खास केलं आहे, अशी पोस्ट आलियाने हे फोटो शेअर करत केली आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Ranbir kapoor