मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Bhatt Pregnancy : रणबीरने केला मोठा खुलासा! स्टार कपलला खरंच होणार का जुळं? पाहा VIDEO

Alia Bhatt Pregnancy : रणबीरने केला मोठा खुलासा! स्टार कपलला खरंच होणार का जुळं? पाहा VIDEO

आलिया-रणबीरला जुळी मुलं हवी आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. काय आहे प्रकरण पाहा VIDEO

आलिया-रणबीरला जुळी मुलं हवी आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. काय आहे प्रकरण पाहा VIDEO

आलिया-रणबीरला जुळी मुलं हवी आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. काय आहे प्रकरण पाहा VIDEO

    मुंबई, 18 जुलै: बॉलिवूडचं क्युट कपल म्हणून अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला (Alia-Ranbir Expecting Twins)ओळखलं जातं. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्न केल्यापासून ते सतत चर्चेत आहेत. अशातच रणबीर-आलिया दोघेही लवकरच आई-बाबा होणार आहेत. आलियानं थेट सोनोग्राफीरूममध्ये काढलेला फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत प्रेग्नेंसीची बातमी दिली होती. तेव्हापासून दोघांचेही चाहते खूपच उत्सुक असलेले पहायला मिळत आहे. प्रेग्नेसींची बातमी शेअर केल्यापासून याविषयी अनेक बातम्या समोर येत आहे. आता याविषयी आणखी एक अपडेट समोर येत आहे. आलिया-रणबीरला जुळी मुलं हवी आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. याविषयी अनेक पोस्ट आणि मीम्सही व्हायरल होत आहेत. मात्र अशा चर्चा का होतायेत हे जाणून घेऊया. नुकतंच रणबीर कपूरनं शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशवेळी फिल्म कम्पॅनियनला मुलाखत दिली. यावेळी रणबीरला एक गेम देण्यात आला होता ज्यामध्ये त्याला दोन खऱ्या गोष्टी आणि एक खोटी गोष्ट सांगायची होती. ज्यामध्ये प्रेक्षक त्यातील खरी गोष्ट कोणती आणि खोटी गोष्टी कोणती ओळखणार. याची उत्तरं देताना रणबीरनं म्हटलं की, "मला दोन जुळी मुलं होणारे आणि मी एका मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग होणार आहे, मी कामातून बराच ब्रेक घेत आहे". रणबीरनं दिलेली ही उत्तरं सध्या सगळ्याचं लक्ष वेधून घेत असून याविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. हेही वाचा -  HBD Bhumi Pednekar : वडील महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तर आई तंबाखूविरोधी कार्यकर्ती, जाणून घ्या भूमीविषयी 'या' खास गोष्टी रणबीरनं जुळ्या मुलांविषयी केलेल्या वक्तव्याविषयी चाहत्यांनी लगेच तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली. रणबीरच्या उत्तराविषयी आता प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक कोणती गोष्ट खरी कोणती खोटी याविषयी सांगत आहेत. रणबीरच्या चाहत्यांनी म्हटलं की, जुळ्या मुलांची गोष्ट खरी असून तो कामावरुन ब्रेक घेणार ही गोष्ट खोटी आहे. त्यामुळे आता आलिया-रणबीरला खरंच जुळी मुलं होणार आहे का?, याविषयी चर्चा रंगली आहे. डॉक्टरांनी तर त्यांना जुळ्या मुलांची हिंट दिली नाही ना?, असंही म्हटलं जातंय. आलिया रणबीरला जुळ्या मुलांची अपेक्षा आहे, असंही म्हटलं जातंय. त्यामुळे रणबीरच्या जुळ्या मुलांच्या वाक्यानं सगळ्यांनात संभ्रमात टाकलंय. दरम्यान, आलिया-रणबीर दोघेही आयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या दोघांचा एकत्र असा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. 'ब्रह्मास्त्र' यावर्षी 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. दोघेही पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याने रणबीर आणि आलियाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Pregnancy, Ranbir kapoor

    पुढील बातम्या