मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ब्रम्हास्त्र बॉयकॉटदरम्यान #आलिया_My_Foot ट्विटरवर होतोय ट्रेंड, काय आहे नेमकं प्रकरण?

ब्रम्हास्त्र बॉयकॉटदरम्यान #आलिया_My_Foot ट्विटरवर होतोय ट्रेंड, काय आहे नेमकं प्रकरण?

alia bhatt

alia bhatt

सगळेच चित्रपट सध्या बॉयकॉटच्या कचाट्यात सापडत आहेत. यामध्ये मोठमोठ्या सुपरस्टार्सच्या चित्रपटांचाही समावेश आहे. अशातच बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 2 सप्टेंबर : सगळेच चित्रपट सध्या बॉयकॉटच्या कचाट्यात सापडत आहेत. यामध्ये मोठमोठ्या सुपरस्टार्सच्या चित्रपटांचाही समावेश आहे. अशातच बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून बहुप्रतिक्षीत 'ब्रम्हास्त्र' आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर स्टारर या चित्रपटाची अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगलीये. ब्रम्हास्त्र बॉयकॉटच्या ट्रेंडमध्ये आता आलियाविषयी नवा ट्रेंड सुरु झालेला पहायला मिळतोय.

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या प्रेग्नेंसी आणि आगामी ब्रम्हास्त्र चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच आलिया आणखी एका नव्या कारणामुळे चर्चत आली आहे. चर्चेमागचं कारण म्हणजे आलियाविषयी ट्विटरवर सुरु असलेला ट्विटर ट्रेंड. निरनिराळ्या कारणांमुळे चर्चेत असणारी आलिया आता #आलिया_My_Foot या ट्रेंडमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलीये. हा ट्विटर ट्रेंड होण्यामागचं नेमकं कारण काय?, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

पहिली गोष्ट म्हणजे आलियाचा आगामी चित्रपट ब्रम्हास्त्र हा बॉयकॉटच्या वादाच सापडला आहे. त्यामुळे चित्रपटांच्या कलाकारांवरही निशाणा साधला जातोय. यामध्ये आलियाही समावेश असून तिच्यावर अनेक भन्नाट मीम्सही व्हायरल होतायेत. त्यात आलियाने म्हटलं होतं की, 'मी आवडत नसेल तर माझे चित्रपटही पाहू नका'. मग तर नेटकरी अजूनच भडकले आहेत. त्यामुळे #आलिया_My_Foot असा ट्रेंड सुरु झाल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, बॉयकॉटच्या शर्यतीत प्रेक्षकांनी अयान मुखर्जीचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटही गुंडाळला आहे. अशा परिस्थितीत 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून बॉलिवूडला खूप अपेक्षा आहेत. त्यातच स्टोरी लीक झाल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे आता चित्रपटाची जादू कमी तर होणार नाही ना?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Bollywood News, Ranbir kapoor, Twitter, Upcoming movie