VIDEO पुन्हा एकदा दिसणार गायिका आलिया भट्ट; गेल्या वर्षीच्या सुपरहिट कंपोझसरसाठी गाणार

VIDEO पुन्हा एकदा दिसणार गायिका आलिया भट्ट; गेल्या वर्षीच्या सुपरहिट कंपोझसरसाठी गाणार

आलिया भट्ट अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेच, पण तिची गाणीही लोकांनी तितकीच डोक्यावर घेतली आहेत. आता ती फक्त अभिनेत्री नव्हे तर सिंगर- डान्सर म्हणून पुढे येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट : आलिया भट्ट अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेच, पण तिची गाणीही लोकांनी तितकीच डोक्यावर घेतली आहेत. आता ती फक्त अभिनेत्री नव्हे तर सिंगर- डान्सर म्हणून पुढे येणार आहे. आलियाने यापूर्वी हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. तिनं गायलेल्या गाण्यांना काही पुरस्कारही मिळालेत. हायवे, हम्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब अशा चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. आता लँबार्गिनी हा हिट अल्बम देणाऱ्या संगीतकारांसाठी आलिया एका खास म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. ती या गाण्यावर फक्त डान्स करणार नाहीये तर ती स्वतः ते गाणं गाणार आहे. प्रादा हे तिचं पहिलं नॉन फिल्मी गाणं येतंय आणि तेही गेल्या वर्षीच्या सुपरहिट म्युझिक कॉम्पोझरबरोबर.

गेल्या वर्षी 'लंबर्गिनी चलाईये' हे लोकप्रिय गाणं देणाऱ्या द दुर्बीण या ग्रूपसाठी आलिया हे नवं गाणं म्हणणार आहे. या निमित्ताने आलिया नॉन फिल्मी गाणं पहिल्यांदाच गाणार आहे.

तिचं हम्टी शर्मा की दुल्हनियाँ या सिनेमासाठी गायलेलं मै तेनू समझावाँ खूप गाजलं होतं. आलियाच्या गाण्याच्या कौशल्याचं तेव्हा खूप कौतुक झालं होतं.

त्यानंतर आलियाने दलजित दोसांज या पंजाबी गायक- अभिनेत्याच्या साथीने उडता पंजाबसाठीसुद्धा हे गाणं गायलं.

आलिया भट द दुर्बीणसाठी गाणं गाणार आहे. या गाण्याची कोरिओग्राफी बॉस्को मार्टिस या फिल्ममेकरने केली आहे. प्रादा असं हे गाणं असणार आहे.

लाखो रुपये खर्च करून ‘या’ ठिकाणाहून जेवण ऑर्डर करतात बॉलिवूड स्टार्स

आलिया भट्ट सध्या अनेक बिग बजेट आणि महत्त्वाकांक्षी सिनेमांमध्ये बिझी आहे. सलमान खानबरोबरचा इन्शाल्लाह, शिवाय सडक2 आणि बॉयफ्रेंड रणबीर कपूरबरोबरचा ब्रह्मास्त्र हे तिचे सिनेमे येणार आहेत.

---------------------------------------------------------------------------------------

VIDEO: TIKTOKचा छंद तरुणाच्या अंगलट, बाईक अंगावर पडून गंभीर जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 05:56 PM IST

ताज्या बातम्या