आलियानं दिला आमिरला नकार

आलियानं दिला आमिरला नकार

'थग्स ऑफ हिन्दोस्तान' सिनेमासाठी आमिरनं आलियाचं नाव सुचवलं,पण आलियानं दिला नकार

  • Share this:

06 एप्रिल : यशराज फिल्म्सचा 'थग्स ऑफ हिन्दोस्तान' सिनेमा अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या सिनेमासाठी वाणी कपुरने काम करावं अशी आदित्य चोप्राची इच्छा होती, मात्र आमिर खानने आलिया भट्टचं नाव सुचवलं होतं. आता चक्क आलिया भट्टनेच सिनेमात काम करण्यास नकार दिल्याची चर्चा सर्वत्र रंगतेय.

'बद्रीनाथ की दुल्हनियां' सिनेमाच्या धमाकेदार यशानंतर आलिया तिच्या प्रत्येक सिनेमातील भूमिकेबाबत चोखंदळ झालीय. तिला कोणत्याही सिनेमात छोटी भूमिका साकारण्याची इच्छा नाहीय. शिवाय आमिर खानच्या सिनेमात अभिनेत्रीला फार संधी नसते.

आमिर खानसोबत काम करण्याची आलियाची फार इच्छा आहे. पण ज्या सिनेमात तिच्या भूमिकेला फार संधी नसेल,त्या सिनेमात आलिया काम करणार नाही, असं तिचं म्हणणं आहे.

आलियाने सिनेमा करण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा आदित्य चोप्रा एका नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहे. मध्यंतरी या सिनेमासाठी सारा अली खानच्या नावाची चर्चासुद्धा रंगली होती. मात्र यावरुन आदित्य चोप्रा आणि आमिरमध्ये मतभेद निर्माण झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 06:10 PM IST

ताज्या बातम्या