VIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित?

VIDEO : दीपिकानंतर आलियानंही केला लग्नाबाबत खुलासा, काय असणार गुपित?

गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत असलेलं आलिया-रणबीरच्या रिलेशनबाबत आता काही विधान केली जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लक्स गोल्डन रोस अॅवॉर्डमध्ये आलियानं लग्नावरून काही खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : दीपिका आणि रणवीरच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये अनेक जोडप्यांच्या लग्नाबाबत चर्चा सुरू आहे. त्यातीलच एक आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे प्रसिद्ध जोडपं आहेच आणि यांच्या रिलेशन चर्चा असतानाच आता मात्र खुद्द आलिया भट्टने याबाबत खुलासा केला आहे.


सध्या आलिया भट्ट कपूर कुटुंबीयांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेता ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना पाहण्यासाठी आलियाने देखील न्यूयॉर्कला भेट दिली होती. रणबीर-आलियाचे न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरतानाचे फोटोससुद्धा त्यावेळी व्हायरल झाले होते.

लक्स गोल्डन रोस अॅवॉर्डच्या रेड कार्पेटवर आलियानं लग्नाबाबत खुलासा केला आहे कि बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा काळ चालू आहे. यावेळी तिने दीपिका आणि रणवीरला लग्नासाठी शुभेच्छा देत प्रियांकाच्या लग्नाबाबत ती फार खूश आहे असं तिने म्हटलं आहे.


यानंतर 'तुमच्या लग्नासाठी आम्हाला किती वाट पाहावी लागेल? असा प्रश्न विचारताच 'थोडी अजून वाट पाहावी लागले' असं उत्तर आलियानं दिलं आहे. 'क्लायमॅक्स चांगला झाला पाहिजे आणि शेवटही आनंदी व्हावा असं आलियाला वाटतं आहे.


आलिया भट्टच्या या उत्तरानंतर लवकरच रणबीर-आलिया लग्न करणार हे सिद्ध झालं आहे. 2019 मध्ये ते दोघं लग्न करतील अशी आशा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2018 07:08 PM IST

ताज्या बातम्या