Home /News /entertainment /

Alia Bhatt pregnancy: 'मी एक स्त्री आहे पार्सल नाही'; माध्यमांच्या खोट्या बातम्यांवर भडकली आलिया

Alia Bhatt pregnancy: 'मी एक स्त्री आहे पार्सल नाही'; माध्यमांच्या खोट्या बातम्यांवर भडकली आलिया

आलिया भट्टने(Alia Bhatt announces pregnancy with Ranbir Kapoor) आपल्या गुड न्यूजबद्दल माहिती दिल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र असं काहीतरी घडलं आहे जिने ती फारच नाराज झाली आहे.

  मुंबई 28 जून: बॉलिवूडच्या एका मोठ्या अभिनेत्रीने काळ तिची गुड न्यूज  शेअर केल्यापासून अनेकांच्या आनंदाला पारवार राहिला नाही. ही अभिनेत्री म्हणजे (Ranbir Kapoor) रणबीर कपूरची नव्याने झालेली बायको (Alia Bhatt announces pregnancy) आलिया भट. आलियाच्या घरी छोट्या पाहुण्याच्या किंवा पाहुणीच्या येण्याचे वेध लागले आहेत. आलियाने काल एक पोस्ट शेअर करत तिच्या प्रेग्नन्ट असण्याची न्यूज सगळ्या जगाला दिली. पण आज आलियाने काही प्रसार माध्यमांना निशाणा बनवत एक मोठी नाराजी व्यक्त केली आहे. आलियाच्या प्रेग्नन्सीची बातमी अनेक छोट्या-मोठ्या प्रसार माध्यमांनी कव्हर केली होती. मात्र एका न्यूज पोर्टलने आलियाच्या प्रेग्नन्सी (Alia Bhatt Pregnancy) बद्दल वाटेल ते डिटेल्स छापल्याचं आलियाचं म्हणणं आहे. आलिया आता आराम करणार आहे, तिला रणबीर कपूर युके न्यायला येणार आहे, तिने आपली प्रेग्नसी अगदी योग्य वेळेत प्लॅन केली जेणेकरून तिच्या शूटिंगवर परिणाम होऊ नये असे काही डिटेल्स एका न्यूज पोर्टलकडून छापण्यात आलं होतं. या पोर्टबद्दल आपली नाराजी व्यक्त करत (Alia Bhatt disappointed rumors regarding pregnancy) तिने एक खास इन्स्टाग्राम स्टोरी सुद्धा शेअर केली. त्यात ती असं म्हणते, ‘आपण आजही पितृसत्ताक समाजात राहतो.. तुमच्या माहितीसाठी… काहीच बदल झाले नाहीयेत, कशातच उशीर झाला नाहीये. कोणीही मला न्यायला येणार नाहीये. कोणीच मला पिक अप करायची गरज नाहीये. मी एक स्त्री आहे पार्सल नाही. मला आरामाची गरज नाहीये पण ऐकून बरं वाटलं की तुमच्यापैकी काही जणांना डॉक्टरच्या सल्ल्याची गरज आहे. हे 2022 आहे, आपण या पुरातन विचारातून बाहेर येऊ शकतो का? आता एक्सक्यूज मी माझा शॉट रेडी आहे’ आलियाने अशा तिखट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. आजच्या जगात सुद्धा एका स्वतंत्र स्त्री ला अशा वाह्यात गोष्टींना सामोरं जावं लागत याचा राग तिने व्यक्त केला आहे.
  आलियाने आज सकाळी एक खास फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांचे आणि इतर सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. तसंच नितु कपूर यांनी काळ आलिया-रणबीरचा एक अत्यंत गोड फोटो शेअर केल्यावर तिने आपला इन्स्टाग्राम डीपी सुद्धा बदलला. हे ही वाचा- Alia Bhatt Pregnancy : आलियाने बदललेल्या Instagram DP ची चर्चा; हाच तो क्षण ज्या वेळी रणबीरने केलं होतं प्रपोज
   आलियाने आपल्या कालच्या पोस्टमध्ये ती, रणबीर आणि अल्ट्रासाऊंड मशीन असलेला एक फोटो शेअर केला आहे. यात ती बेडवर झोपलेली असून त्या मशिनकडे पाहत आहे असं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सिंहाचं एक कुटुंब दिसत असून सिंहीणी सिंहाकडे प्रेमाने बघत आहे आणि त्यांचा नवजात छावा सुद्धा त्यात दिसत आहे. या फोटोला तिने ‘Our baby ….. coming soon ♾❤️✨’ अशी कॅप्शनसुद्धा दिली होती. या पोस्टवर अनेक तारेतारकांनी तिचं अभिनंदन केलं आणि तिला शुभेच्छा दिल्या.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Bollywood News, Pregnancy, Ranbir kapoor, Small baby

  पुढील बातम्या