मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Bhatt & Ranbir Kapoor: ...अन् मला बघून रणवीरला रडू कोसळलं; आलियानं सांगतला 'तो' किस्सा

Alia Bhatt & Ranbir Kapoor: ...अन् मला बघून रणवीरला रडू कोसळलं; आलियानं सांगतला 'तो' किस्सा

आलिया भट्टने नुकताच लग्नातला एक अनसीन किस्सा शेअर केला आहे. या जोडीचं लग्न सगळिकेच खूप गाजलं होतं.

आलिया भट्टने नुकताच लग्नातला एक अनसीन किस्सा शेअर केला आहे. या जोडीचं लग्न सगळिकेच खूप गाजलं होतं.

आलिया भट्टने नुकताच लग्नातला एक अनसीन किस्सा शेअर केला आहे. या जोडीचं लग्न सगळिकेच खूप गाजलं होतं.

    मुंबई 02 ऑगस्ट: बॉलिवूड नव्हे तर भारतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून आलिया भट्टची ओळख आहे. सध्या आलिया वर्क फ्रंटवर जोरदार बॅटिंग करताना दिसत आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसची पहिली वहिली कलाकृती ‘डार्लिंग्ज’ येत्या काळात नेटफ्लिक्सवर दाखल होणार आहे. आलियासाठी हे वर्ष बरंच खास आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात सध्या ती अनेक टप्पे पार करताना दिसत आहे. एका मुलाखतीत तिच्या लग्नातला एक किस्सा तिने शेअर केला आहे ज्याची बरीच चर्चा होत आहे. 2022 मध्ये ज्या बॉलिवूड कपलचं लग्न जोरदार गाजलं ते म्हणजे आलिया रणबीर. एप्रिल महिन्यात आपल्याच घरातल्या बाल्कनीत छोटेखानी सोहळा आयोजित करून ही जोडी विवाहबंधनात अडकली होती. यावेळी आलिया रणबीरच्या छोट्यात छोट्या हालचालींकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आलिया जेव्हा लग्नातल्या वेशात नटून बाहेर आली तेव्हा तिला बघून रणबीरच्या डोळ्यात पाणी तरारल्याचं तिने नुकतंच शेअर केलं. बॉलिवूड बबलशी बोलताना ती असं सांगते, “मी आयुष्यात पहिल्यांदा रणबीरच्या डोळ्यात पाणी पाहिलं. जेव्हा मी लग्नाच्या वेशात त्याच्यासमोर आले तेव्हा त्याचे डोळे किंचित पाणवल्याचं मला दिसलं. त्याने मला बघितलं अन् त्याला रडू कोसळलं. आणि मला ते बघून वेगळं वाटलं पण खूप छानही वाटलं. आम्ही लगाच्या दिवशी एकमेकांसोबत जेवण केलं. एकमेकांशी हात मिळवून बाय गर्लफ्रेंड आणि बाय बॉयफ्रेंड असं म्हटलं कारण बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणून आमचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आम्ही नवरा बायको होणार होतो. एकमेकांना टाटा बाय बाय करून आम्ही लग्नासाठी तयार व्हायला गेलो.”
    आलियाने या मुलाखतीत तिच्या गरोदरपणानंतर कामावरून होणाऱ्या काही कमेंट्सबद्दल सुद्धा मत मांडलं आहे. “माझ्या गरोदरपणानंतर अशा अनेक बातम्या आल्या ज्यामध्ये फक्त माझ्यावर नाही तर संपूर्ण स्त्रियांवर आणि त्यांच्या एका अवस्थेबद्दल बरीच वक्तव्य केली गेली. ते केवळ माझ्याबद्दल बोललं गेलं म्हणून नाही पण सगळ्या स्त्रियांबद्दल त्यांच्या शारीरिक अवस्थेतील बदलांबद्दल जे मत व्यक्त केलं ते अयोग्य आहे. माझ्याबद्दल असा अनेक फेक न्यूज बनवण्यात आल्या आहेत. गरोदर असल्याची बातमी समजल्यावर बऱ्याच चांगल्या बातम्या सुद्धा आल्या पण त्यात दिलेली काही माहिती खोटी होती. हे ही वाचा- Alia Bhatt: 'मी 100 वर्षांची होईपर्यंत काम करेन'; आलियाचा वर्क लाईफ फंडा चर्चेत मी सातत्याने काम करत असताना प्रेग्नंन्सीमुळे अचानक आयुष्य बदलून जाईल, स्वप्न संपून जातील अशा पद्धतीने ज्या सुरात बातम्या दिल्या जात होत्या त्यावर मी प्रश्न उपस्थित केला. एखाद्या घटनेचा गाभा पोहोचवला जात असेल तर ते खूप चुकीचं आहे.” आलिया गरोदरपणातही स्वतःची उत्तम काळजी घेत सातत्याने काम करताना आणि प्रेक्षकांना चकित करताना दिसत आहे.
    First published:

    Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Pregnancy, Ranbir kapoor, Wedding

    पुढील बातम्या