Home /News /entertainment /

Alia Bhattने ब्ल्यू बिकिनीमध्ये वेधलं लक्ष! अभिनेत्रीच्या 'नो मेकअप' लुकची होतेय चर्चा

Alia Bhattने ब्ल्यू बिकिनीमध्ये वेधलं लक्ष! अभिनेत्रीच्या 'नो मेकअप' लुकची होतेय चर्चा

आलिया भट्टने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक बिकिनी फोटो शेअर केला आहे.

  मुंबई, 13ऑक्टोबर- आलिया भट्ट(Alia Bhatt) ही एक अशी बॉलिवूड अभिनेत्री आहे जी सतत चर्चेत असते. आलियाने फारच कमी वयात हे यश मिळवलं आहे. आलियाकडे सध्या अनेक प्रोजेक्टस आहेत. तिच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना मोठी प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे ती रणबीर कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. दरम्यान आलियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपला ब्ल्यू बिकिनीमधील (Bikini Look) फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे.
  आलिया भट्टने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये आलिया एका नयनरम्य ठिकाणी विश्रांती घेताना दिसून येत आहे. ती फारच रिलॅक्स दिसून येत आहे. अभिनेत्रीने यामध्ये स्ट्रॅपलेस ब्ल्यू बिकिनी परिधान केली आहे. या लूकमध्ये फारच बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे. फोटोमध्ये तिचा नो मेकअप लूक आहे. तरीही तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसत आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्रीचा हा रिलॅक्स मूडमधील फोटो फारच पसंत पडत आहे. त्यामुळे चाहते या फोटोला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत. तर काही कलाकारांनीही या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये मनीष मल्होत्राने कमेंट करत 'उफफ्फ' असं म्हणत काही इमोजीही शेअर केली आहेत. (हे वाचा:आलियाने 'Darlings'चं शुटींग केलं पूर्ण; शेयर केला खास VIDEO – News18 ... ) आलिया भट्टने आपला हा फोटो शेअर करत त्या फोटोला एक सुंदर कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शन लिहीत आलिया भट्टने म्हटलं आहे, 'आपण सर्वजण त्वचेखाली लपलेले तारे आहोत. तो प्रकाश ज्याला आपण शोधत असतो तो आपल्या आतच आहे.' तसेच हा फोटो आपली बहीण शाहीन भट्टने काढल्याचंही तिनं सांगितलं आहे.आलिया भट्ट ही एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनय आणि क्युट फेसने तिनं तरुणाईला वेड लावलं आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात. (हे वाचा:JUST IN: 'गंगूबाई काठियावाडी'ची रिलीज डेट Out; नववर्षात आलिया भट्टचा ... ) आलिया भट्टच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीचा बहुचर्चित 'गंगूबाई काठियावाडी' लवकरच रिलीज होणार आहे.त्यांनतर आलिया राजामौली यांच्या बिग बजेट 'RRR'मध्येही झळकणार आहे. नुकताच तिने आपला चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला होता. त्यांनतर नुकताच तिने आपल्या 'डार्लिंगस'चित्रपटाचं शूटिंगदेखील पूर्ण केलं आहे. तर आगामी काळात ती 'ब्रम्हास्त्र' या बहुचर्चित चित्रपटात बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Alia Bhatt, Entertainment

  पुढील बातम्या