Video : आलिया भटनं सर्वांसमोर दिली प्रेमाची कबुली, 'अशी' होती बॉयफ्रेंड रणबीरची प्रतिक्रिया

Video : आलिया भटनं सर्वांसमोर दिली प्रेमाची कबुली, 'अशी' होती बॉयफ्रेंड रणबीरची प्रतिक्रिया

बॉलिवूडमध्ये मानाचा समजला जाणारा 64वा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा शनिवार, 23 मार्चला मुंबईतील जिओ गार्डनमध्ये पार पडला. यावेळी अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

  • Share this:

मुंबई, 24 मार्च : बॉलिवूडमध्ये मानाचा समजला जाणारा 64वा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा शनिवार ( 23 मार्च) मुंबईतील जिओ गार्डनमध्ये पार पडला. बॉलिवूडच्या सर्वच कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी रेड कार्पेटवर सिताऱ्यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. मात्र संपूर्ण सोहळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे अभिनेत्री 'आलिया भट' आणि चॉकलेट बॉय 'रणबीर कपूर'. आलिया आणि रणबीरनं एकत्रच फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली आणि विशेष म्हणजे यावर्षीचे बेस्ट अॅक्टर अवॉर्ड रणबीरनं तर बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड आलियानं पटकावले. संपूर्ण सोहळ्यादरम्यान सर्वांच्या नजरा या क्युट जोडीवर खिळल्या होत्या.

'राझी' सिनेमामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर 2019चा बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड प्रदान करण्यात आला. मात्र स्टेजवर पोहोचल्यावर आलियानं जाहीररित्या असं काही म्हटलं की, ते ऐकून खुद्द रणबीर कपूरही आश्चर्यचकीत झाला. अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर पोहोचलेल्या आलियानं बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा रणबीर कपूर तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेताना दिसला. पण बोलणं संपवताना आलियानं रणबीरवरील प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिली. आलियानं स्टेजवरूनच त्याला 'आय लव्ह यू रणबीर' म्हटल्यावर मात्र रणबीर चक्क लाजला. आलियानं रणबीरवरील प्रेमाची कबुली दिल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
 

View this post on Instagram
 

Alia Bhatt- I love you (from stage) after winning award, while Ranbir Kapoor is all smiles❤😇 #FilmfareAwards2019 #RanbirKapoor #Ranbir #AliaBhatt #Bollywood


A post shared by Ranbir Kapoor Universe (@ranbirkapooruniverse) on

आलियानं आपलं प्रेम व्यक्त केल्यावर रणबीरचा चेहरा लाजेनं लाल झाला होता. आलिया-रणबीरनं यापूर्वीही आपलं नातं सर्वांसमोर कबूल केलं असलं तरीही अशाप्रकारे जाहीररित्या प्रेम व्यक्त होण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळी हा क्षण एखाद्या रोमँटिक सिनेमातील दृश्यासारखा वाटत होता. यावेळी रणबीर आणि आलियानं फक्त अवॉर्डच नाही तर सर्वांची मनंही जिंकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 01:38 PM IST

ताज्या बातम्या