News18 Lokmat

No Fathers in Kashmir Teaser- 'हर कोई सोचता है की वो काश्मीर को जानता है...'

या सिनेमात १६ वर्षांच्या दोन व्यक्तिरेखांमधील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. सिनेमातील दोन्ही कलाकार काश्मीर खोऱ्यात त्यांच्या हरवलेल्या वडिलांच्या शोधात असतात असं दाखवण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 16, 2019 06:53 AM IST

No Fathers in Kashmir Teaser- 'हर कोई सोचता है की वो काश्मीर को जानता है...'

मुंबई, १६ मार्च २०१९- आलिया भट्टने आई सोनी राजदान यांच्या आगामी 'नो फादर्स इन काश्मीर' सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला. येत्या ५ एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात सोनी यांच्याशिवाय अश्विन कुमार, अंशुमान झा आणि कुलभूषण खरबंदा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘नो फादर्स इन काश्मीर’ या सिनेमाला तब्बल आठ महिन्यांनी यूए सर्टिफिकेट देण्यात आले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे गेला होता. आपल्या या सिनेमाला न्याय देण्यासाठी निर्मात्यांना आणि कलाकारांना आठ महिने, सहा स्क्रिनिंग आणि सात सुनावणीपर्यंतची वाट पाहावी लागली.

या सिनेमाच्या सर्टिफिकेशन देण्याला एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा विलंब करण्यात आला. अखेर हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. आपल्या सिनेमासाठी अश्विन यांनी लढाई सुरूच ठेवली तेव्हा या सिनेमाला ए सर्टिफिकेट देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला.


या सिनेमात १६ वर्षांच्या दोन व्यक्तिरेखांमधील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. ही प्रेमकथा काश्मीरच्या खोऱ्यात घडताना दाखवले आहे. सिनेमातील दोन्ही कलाकार काश्मीर खोऱ्यात त्यांच्या हरवलेल्या वडिलांच्या शोधात असतात असं दाखवण्यात आलं आहे.

Loading...

सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये नूरची कथा सांगण्यात आली आहे. नूर ही ब्रिटीश भारतीय असते जी आपल्या बेपत्ता वडिलांचा शोध घेण्यासाठी काश्मीरमध्ये परत येते. इथे तिची ओळख माजिदशी होते. सिनेमात माजिद कशाप्रकारे तिच्या वडिलांना शोधण्यामध्ये मदत करतो ते दाखवण्यात आले आहे.सिनेमाची टॅगलाइनही आकर्षक आहे. 'हर कोई सोचता है की वो काश्मीर को जानता है..' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. सिनेमा काश्मीरचं वास्तव आणि तिथल्या लोकांची खरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अश्विन कुमार यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 06:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...