मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सैफ अली खानच्या मुलाला Alia Bhatt ने केलं रिजेक्ट तर रणवीरची केली निवड; या 'Poo' चा VIDEO पाहिलात का?

सैफ अली खानच्या मुलाला Alia Bhatt ने केलं रिजेक्ट तर रणवीरची केली निवड; या 'Poo' चा VIDEO पाहिलात का?

20 Years of Kabhi Khushi Kabhi Gham: स्वत:ला करीनाची फॅन म्हणवणारी आलिया भट्ट (Alia Bhatt Recreating Scene from K3G) ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने तिच्या लाडक्या 'Poo' चा एक सीन खास स्टाइलमध्ये रीक्रिएट केला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 13 डिसेंबर: बॉलिवूडचे असे काही चित्रपट आहेत ज्यांचा चाहतावर्ग अनेक वर्षांनतरही आहे. 'कभी खुशी कभी गम' (20 years of Kabhi Khushi Kabhi Gham) हा सिनेमा देखील त्यापैकीच एक. या सिनेमाचा स्वतःचा एक चाहतावर्ग आहे. लाखो लोकांनी पसंत केलेला हा चित्रपट दोन दशकांनंतरही अनेक चाहत्यांचा फेव्हरीट आहे. शाहरुख खान, काजोल, करीना कपूर, हृतिक रोशन, अमिताभ आणि जया बच्चन असे दिग्गज कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.  K3G ला अलीकडेच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुक केले आहे. अनेकांनी सिनेमातील सीन रीक्रिएट केले आहेत. यात स्वत:ला करीनाची मोठी फॅन म्हणवणारी आलिया भट्ट (Alia Bhatt Recreating Scene from K3G) देखील मागे राहिली नाही आहे. तिने तिच्या लाडक्या 'Poo' चा एक सीन खास स्टाइलमध्ये रीक्रिएट केला आहे.

हे वाचा-राजकुमारी सारखीच दिसतेय 'Vicky की दुल्हन', कतरिनाने अशी केली लग्नमंडपात एंट्री

आलियाने यामध्ये Poo ची नक्कल अगदी हुबेहूब केली आहे. यामध्ये तिने प्रॉम नाइटसाठी डेट निवडताना जो सीन आहे तो रीक्रिएट केला आहे. यात हृतिकचे डायलॉग्स रणवीर सिंग म्हणत आहे. पण एक बाब तुम्ही या व्हिडीओत तुम्ही नोटीस केली का? यात रणवीरची निवड करण्याआधी ज्या मुलांना आलिया रिजेक्ट करते त्यात सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान देखील आहे.

रणवीर आणि आलिया सध्या करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यामध्ये देखील तगडी स्टार कास्ट असणार आहे. या दोन सुपरस्टार्ससह धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी ही ज्येष्ठ कलाकार मंडळी देखील दिसणार आहे. त्या दरम्यानच त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून आलियाच्या या स्कीलचं देखील कौतुक केलं जात आहे. दरम्यान आलियाच नव्हे तर करीनाने देखील या K3G च्या 20 वर्षांच्या आठवणीत हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने आलियाचं कौतुक देखील केलं आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood News, Kareena Kapoor, Ranveer singh