तर दुसऱ्या एका व्हिडीओत आलिया 'जलेबी बाई' या गाण्यावर थिरकतानाही दिसतेय. या गाण्यावर तिने तिच्या मैत्रिणींसोबत जबरदस्त ठुमके लावून लग्नात एक आनंदाचं वातारण तयार केलं आहे.View this post on Instagram
व्हिडिओमध्ये आलियाने गुलाबी रंगाचा लेहंगा घातलेला दिसतो. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. या लग्नातील अनेक फोटोही समोर आले आहे. (वाचा-ड्रेसिंग सेन्सवरून अनन्या पांडेला नेटकऱ्यांनी डिवचलं; चीअर लीडरशी केली तुलना) आलिया अलीकडेच तिच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या टीझरमुळे चर्चेत आली होती. तिच्या या टीझरला चाहत्यांनी चांगलीचं पसंती दिली आहे. याशिवाय ती लवकरच रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' या बहुचर्चित चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर आलिया बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौलीच्या आगामी 'आरआरआर' (RRR) या चित्रपटातही दिसणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Dance video, Marriage