मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलियाच्या लग्नात बहिणींची असणार हवा! चोरलेले बूट मिळविण्यासाठी रणबीर देणार तब्बल इतकी रक्कम

आलियाच्या लग्नात बहिणींची असणार हवा! चोरलेले बूट मिळविण्यासाठी रणबीर देणार तब्बल इतकी रक्कम

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर  (Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding)  हे सध्याच्या बॉलिवूड कपल्सपैकी सर्वाधिक चर्चेत असणारं कपल आहे. सध्या या दोघांच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत. आलिया-रणबीर (Ranbir Alia Wedding) 14 एप्रिल रोजी आर. के. स्टुडिओच्या परिसरात होणाऱ्या सोहळ्यात लग्न करणार असल्याचं तिचे काका रॉबिन भट्ट यांनी सांगितलं होतं.

पुढे वाचा ...

मुंबई, 13 एप्रिल-   अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर  (Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding)  हे सध्याच्या बॉलिवूड कपल्सपैकी सर्वाधिक चर्चेत असणारं कपल आहे. सध्या या दोघांच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत. आलिया-रणबीर (Ranbir Alia Wedding) 14 एप्रिल रोजी आर. के. स्टुडिओच्या परिसरात होणाऱ्या सोहळ्यात लग्न करणार असल्याचं तिचे काका रॉबिन भट्ट यांनी सांगितलं होतं. दरम्यान, दोघांच्या लग्नाबद्दल रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. अशातच रणबीरने त्याच्या लग्नाच्या बूट चोरीच्या समारंभासाठी (Shoe Stealing Ceremony) खास रक्कम निश्चित केल्याचं कळतंय. रिपोर्ट्सनुसार, रणबीर आलियाच्या गर्ल्स गँगसाठी एक लाख रुपये देणार आहे.

रणबीर आणि आलियाच्या लग्नासाठी एक ठराविक रकमेचं बजेट ठेवण्यात आलंय. याबद्दल बोलताना या कपलच्या जवळच्या एका सूत्राने सांगितलं की, आलियाची गर्ल गॅंग रणबीरचे बूट चोरल्यानंतर परत देण्याच्या बदल्यात पैसे घेईल. यासाठी या गर्ल गँगला 1 लाख रुपये देण्याचं बजेट ठेवण्यात आलं आहे. माझ्या माहितीनुसार, या लग्नात संगीत कार्यक्रम होणार नाही. मेहंदीच्या कार्यक्रमात डान्स आणि इतर कार्यक्रम होतील. प्री-वेडिंग फंक्शन्ससाठी (Pre- Wedding Functions) असा कोणताही वेगळा आणि समर्पित कार्यक्रम नाही. असं वृत्त दैनिक भास्करने सूत्रांच्या हवाल्याने दिलंय.

सेलिब्रिटीजच्या लग्नात वीणा नागडा या मेहंदी काढताना दिसतात. पण रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि आलिया त्यांच्या लग्नात मेहंदी लावायला दुसऱ्या कोणालातरी बोलावणार आहेत. वीणा नागदा यांच्याऐवजी आलियाने दुसऱ्या मेहंदी डिझायनरची निवड केल्याचं कळतंय. तसंच आधी कोणत्याही सेलिब्रिटीचं लग्न कव्हर न केलेल्या फोटोग्राफरची लग्नात फोटोग्राफर म्हणून आलियाने निवड केल्याचं मीडिया रिपोर्ट्स म्हणणं आहे.

रणबीर आणि आलिया चार वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांचंही एकमेकांच्या कुटुंबियांसोबत चांगलं बाँडिंग आहे. रणबीरची आई नीतू कपूर (Nitu Kapoor) आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांना आलिया खूप आवडते. अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून त्या त्यांचं आलियावरचं प्रेम दाखवत असतात. तर रणबीरही अनेकदा आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदानसोबत मजेत वेळ घालवताना दिसतो.

दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नानंतर एका घरात राहणार आहेत, पण तुम्हाला माहीत नसेल की दोघेही सध्या एकाच इमारतीत राहतात. त्यांच्या लग्नाचे बहुतांश (Indian Wedding Rituals) विधी या ठिकाणीच पार पडणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियामधील रिपोर्टनुसार सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती देण्यात आली आहे की, रणबीर कपूर त्यांच्या लग्नासाठी बिल्डिंग तसंच समोरील रस्त्यावर काही सजावट करणार आहे. त्यामुळे या ग्रँड वेडिंगकडे बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Ranbir kapoor