मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तब्बल 4 वर्षांनंतर 'Brahmastra'चं शूटिंग झालं पूर्ण, बाबा विश्वनाथचं दर्शन घेत Ranbir-Alia नं केली ही प्रार्थना

तब्बल 4 वर्षांनंतर 'Brahmastra'चं शूटिंग झालं पूर्ण, बाबा विश्वनाथचं दर्शन घेत Ranbir-Alia नं केली ही प्रार्थना

आलिया भट्ट  (alia bhatt )आणि रणबीर कपूरच्या ( Ranbir Kapoor )'ब्रह्मास्त्र'  ( Brahmastra ) या सिनेमाचं चित्रीकरण एकदासं पूर्ण झालं आहे.

आलिया भट्ट (alia bhatt )आणि रणबीर कपूरच्या ( Ranbir Kapoor )'ब्रह्मास्त्र' ( Brahmastra ) या सिनेमाचं चित्रीकरण एकदासं पूर्ण झालं आहे.

आलिया भट्ट (alia bhatt )आणि रणबीर कपूरच्या ( Ranbir Kapoor )'ब्रह्मास्त्र' ( Brahmastra ) या सिनेमाचं चित्रीकरण एकदासं पूर्ण झालं आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 29 मार्च- आलिया भट्ट  (alia bhatt )आणि रणबीर कपूरच्या ( Ranbir Kapoor )'ब्रह्मास्त्र'  ( Brahmastra ) या सिनेमाचं चित्रीकरण एकदासं पूर्ण झालं आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्टला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चार वर्षानंतर आता या सिनेमाच्या पहिल्या भागाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.

आलिया भट्टने ( Ranbir Alia )  बनारसमधील एका घाटावर चित्रीत झालेल्या ब्रह्मास्त्र सिनेमाती रॅपचा एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली आहे. तिनं म्हटलं आहे की, आम्ही 2018 मध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली होती. आता या ...ब्रह्मास्त्र सिनेमाच्या पहिल्या भागाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. मी याची कधीपासून वाट पाहत होते...Its a WRAP!!!आता ( Brahmastra Release date ) थ‍िएटरमध्ये 9 डिसेंबरला 2022 ला भेटू.

वाचा-जेव्हा मायरा शूटवेळी 'पुष्पा' सिनेमातील डायलॉग शिकवते.. क्यूट video viral

बाबा विश्वनाथचं घेतलं दर्शन

यासोबत आलियानं काही फोटो देखील शेअर केले आहे. यामध्ये दिसत आहे की, आलियाने बॉयफ्रेंड आणि को-स्टार रणबीर कपूरसोबत काशी विश्वनाथचं दर्शन घेतले आहे. चित्रपटाच्या टीमनं वाराणसीमधील गंगा घाटावरील सिनेमाचं चित्रीकरण संपल्यानंतर देव दर्शन घेतेले आहे. यावेळी सिनेमाच्या टीमनं बाबा विश्वनाथकडे सिनेमाला यश मिळो अशी प्रार्थना केली. आलियानं तिच्या इन्स्टाला याचे काही फोटो शेअर केले आहेत.

आल‍िया-रणबीरसोबत या कलाकारांच्या सिनेमात आहे प्रमुख भूमिका

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र सिनेमात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमात या दोघांचा लुक कसा असणार याचा टीझर समोर आलाच आहे. आलियाच्या वाढदिवसानिमित्त तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता चाहत्यांना सिनेमाची उत्सुकता लागली आहे. ब्रह्मास्त्र सिनेमात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्याशिवाय अम‍िताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय, डिंपल कपाड़‍िया यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा साय-फाय फ‍िक्शनल सिनेमा असून यात आलियाने ईशाची आणि रणबीरने शिवाची भूमिका साकारली आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor