मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia-Ranbir: आलिया-रणबीरमध्ये चक्क 'या' पुस्तकासाठी होतंय भांडण; बेबी रुमबाबत केला खुलासा

Alia-Ranbir: आलिया-रणबीरमध्ये चक्क 'या' पुस्तकासाठी होतंय भांडण; बेबी रुमबाबत केला खुलासा

आलिया-रणबीर

आलिया-रणबीर

बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित कपल्सपैकी एक म्हणून आलिया भट्ट-आणि रणबीर कपूर यांना ओळखलं जातं. हे दोघेही सध्या आपल्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 27 सप्टेंबर-   बॉलिवूडच्या सर्वाधिक चर्चित कपल्सपैकी एक म्हणून आलिया भट्ट-आणि रणबीर कपूर यांना ओळखलं जातं. हे दोघेही सध्या आपल्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढत नवे रेकॉर्ड स्थापित केले आहेत.या चित्रपटाने जगभरात तुफान कमाई केली आहे. अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आणि रिव्ह्यू मिळूनदेखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. त्यामुळे आलिया आणि रणबीर सध्या प्रचंड आनंदी आहेत. हे दोघेही आपल्या एकत्रित पहिल्या चित्रपटाच्या सक्सेसचं सेलिब्रेशन कर आहेत. दरम्यान हे दोघे लवकरच आईबाबा बनणार आहेत.

'ब्रह्मास्त्र' हा आलिया आणि रणबीरचा एकत्र पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाच्या सेटवरच होती. तसं पाहायला गेलं तर,या दोघांची भेट आधीही झाली होती. परंतु या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली होती. या चित्रपटाचं काम तब्बल ९ वर्षे सुरु होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांमध्ये वयाचं मोठं अंतर असूनदेखील त्यांचं प्रेम वाढतचं गेलं. विशेष म्हणजे या दोघांनी ब्रह्मास्त्र रिलीजज व्हायच्या आधीच लग्नदेखील केलं होतं. त्यामुळे या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या लग्नानंतर चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. आता लवकरच या दोघांची एक नवी इनिंग सुरु होणार आहे. दोघेही आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

दरम्यान रणबीर आई आलिया सतत मुलाखतींदरम्यान एकमेकांबाबतचे सिक्रेट्स शेअर करत असतात. अशाच एका गोष्टीमुळे हे दोघे सध्या चर्चेत आहेत. एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने सांगितलं की, त्यांनी आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सर्व तयारी केली आहे. बाळाची खोलीदेखील तयार केली आहे. रणबीरने सांगितलं की, कधीकधी आमच्यात मुलाबाबत भांडणदेखील होत असतं. रणबीरने सांगितलं की, आलियाने येणाऱ्या बाळासाठी पालकत्वाचं एक पुस्तक वाचलं आहे. मी ते पुस्तक फक्त 30 टक्के वाचलं आहे. याच कारणावरुन आमच्यात भांडण सुरु आहे. आपण आपल्या पहिल्या अपत्यासाठी प्रचंड उत्साही असल्याचंही रणबीरने सांगितलं आहे.

तसेच रणबीर आणि आलियाने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, बाळासाठी आमची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी आम्ही एक चेकलिस्टसुद्धा बनवली आहे. ती लिस्ट आता पूर्ण झाली आहे. आम्ही सुंदर बेबी रुम तयार केली आहे. येणाऱ्या बाळाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

(हे वाचा: Shilpa shetty : शिल्पा शेट्टीने पुरवले प्रेग्नेंट आलियाचे डोहाळे; मध्यरात्रीच आलियाला दिलं खास सरप्राईज)

रणबीर कपूरने आपलं मजेशीर बेडरुम सिक्रेट शेअर करताना सांगितलं की, आलियाला अतरंगी झोपण्याची सवय आहे. तिचा पाय कुठेतरी असतो आणि डोकं दुसरीकडे असतं. कधी कधी मला बेडच्या एका कोपऱ्यात झोपावं लागतं.

First published:

Tags: Alia Bhatt, Entertainment, Ranbir kapoor