Home /News /entertainment /

Darlings Teaser Out: आलियाचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण! 'डार्लिंग'चा खतरनाक टिझर आऊट

Darlings Teaser Out: आलियाचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण! 'डार्लिंग'चा खतरनाक टिझर आऊट

आलिया लवकरचं आई म्हणून तिच्या वैयक्तिक आयुष्यात पदार्पण करणार आहे. पण त्याआधी आलिया भट्टची निर्मिती असलेला डार्लिंग हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलियाची निर्मिती असलेला हा पहिला सिनेमा असणार असून सिनेमाचा खतरनाक टिझर आज प्रदर्शित झाला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 05 जुलै: आलिया भट्ट ( Alia Bhatt) उत्तम अभिनेत्री आहे हे तिने तिच्या विविध भूमिकांद्वारे दाखवून दिलेच आहे. पण आता ती निर्मितीच्या क्षेत्रातही आपले भविष्य आजमवणार आहे. आलिया भट्ट लवकरच तिच्या 'डार्लिंग' (Darlings Teaser Out)  या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. आजच आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर याची घोषणा केली. त्याचबरोबर या चित्रपटाचा टिझरसुद्धा शेअर केला. डार्लिंग चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत शेफाली शाह, विजय वर्मा आणि साऊथचा कलाकार रोशन मॅथ्यू हे सुद्धा प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहेत. डार्लिंगमध्ये आलिया करणार डार्क कॉमेडी आलियाने या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर शेअर  करताना It's Just a tease Darling असे कॅप्शन देत हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवरती प्रदर्शित होणार आहे याची माहिती दिली. चित्रपटगृहात प्रदर्शित न होता थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारा 'डार्लिंग' हा अलियाचा दुसरा चित्रपट ठरला आहे.
  हेही वाचा - 'कुठली महाराणी लागून गेलीस, स्वतःचे कपडे स्वतः सांभाळ'; मुसळधार पावसात नोराचे नखरे बघून भडकले नेटिझन्स चित्रपटाच्या टिजरची सुरुवात साप आणि विंचवाच्या गोष्टीने होते. आलिया भट्टचा आवाज या टीजरला एक मजेशीर पण गंभीर टच देत आहे. डार्लिंगच्या टीजरला चित्रपट समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच आलिया भट्टच्या फॅन्सनी तर टिझर रिलीज होताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारांनीसुद्धा तिच्या पोस्टवर कमेंट करत आलियाला तिच्या या नवीन  चित्रपटासाठी  शुभेच्छा दिल्या आहेत. अलियाने तिच्या 'इटर्नल सनशाईन प्रोडक्शन्स' कडून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्माती म्हणून 'डार्लिंग' हा आलियाचा पहिलाच चित्रपट आहे. सध्या या चित्रपटासोबतच आलिया आणि रणबीर कपूरचा बिग स्टारर  'ब्रम्हास्त्र' चित्रपटही येत्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या ट्रेलरलाही चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. आलीया भट्टने नुकतीच तिच्या प्रेग्नन्सीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. तेव्हापासून चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते. आता  आलिया भट्टने डार्लिंगचा टीजर रिलीज केल्यापासून तर तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. डार्लिंगचा टीजर तर खतरनाक सोबत मजेशीर आहे पण चित्रपट कसा असेल याची उत्सुकता आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News

  पुढील बातम्या