Home /News /entertainment /

तिशीच्याआत आई होण्याची कपूरांच्या सुनांची परंपरा आलियानं कायम राखली! पण... सासूसारखी राहणार का सिनेसृष्टीपासून लांब?

तिशीच्याआत आई होण्याची कपूरांच्या सुनांची परंपरा आलियानं कायम राखली! पण... सासूसारखी राहणार का सिनेसृष्टीपासून लांब?

बॉलीवूड अभिनेत्रींनी लग्न करणे आणि मातृत्व स्वीकारणे म्हणजे त्यांच्या कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला, असं वातावरण पूर्वी होतं. कपूर घराण्यातल्या बबिता आणि नीतू कपूर यांनी लग्न झाल्यानंतर लगेचच आई व्हायचा निर्णय गेत चित्रपट कारकीर्दीला रामराम ठोकला. आता सासवांप्रमाणे आलियासुद्धा तो तसा निर्णय घेत ब्रेक घेणार की...

पुढे वाचा ...
  मुंबई, 27 जून : अभिनेत्री आलिया भट्टनं (Alia bhatt pregnant)नुकतीच एक आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आपल्या Instagram वर फोटो शेअर करत आलियाने (Alia bhatt instagram account) म्हटलं की, आमचं बाळ..... लवकरच येणार आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. आलियानं (alia pregna ncy news) शेअर केलेल्या फोटोत रणबीर कपूरही (Ranbir kapoor) दिसत आहे. आलियांनं ही बातमी शेअर केल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. याचीच जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू असलेली दिसत आहे. कपूर घराण्यातल्या बहुते सुना तिशीच्या आत आई झाल्या आहेत. आलिया ही कपूर घराण्याची तिसरी सून आहे जी वयाच्या 30 व्या वर्षाच्या आत बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. पण कपूर घराण्याच्या या इतिहासात असाही इतिहात आहे (Kapoor history) की या घरातल्या सुना लग्नानंतर किंबहुना बाळाला जन्म दिल्यानंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकतात. आता आलियासुद्धा आपल्या दोन सासवांसारखी ब्रेक घेणार की, आपल्या नणंदांसारखी काम करत राहणार हा प्रश्न आहे. बबिता कपूर - कपूर घराण्यातील बबिता कपूर (babita kapoor),नितू कपूर (Nitu kapoor)आणि आता त्यानंतर आलिया भट्ट कपूर या तिघींनीही आपल्या तिशीच्या आत आई होण्याचा निर्णय घेतला. बबिता कपूरचं रणधीर कपूर यांच्यासोबत लग्न झालं होतं. बबिता कपूर या एक अभिनेत्री देखील होत्या. बबिता कपूरसुद्धा 26 व्या वर्षी आई झाल्या होत्या. करिष्मा कपूर आणि करुना कपूर अशा दोन मुलींना त्यांनी जन्म दिला. करिष्मा आणि करिना दोघीही बाॅलिवूडमध्ये नावाजलेल्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. हेही वाचा - BREAKING NEWS: आलिया- रणबीरने दिली खरोखरची Good News, थेट सोनोग्राफी रूममधून आला रिपोर्ट नीतू कपूर - अभिनेते ऋषी कपूर यांनी नीतू कपूर यांच्याशी विवाह केला. नितू कपूरही लग्नाच्या पहिले एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. लग्नानंतर त्यांनी आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केलं. नितू कपूर यांनी 22 व्या वर्षी  पहिल्या अपत्याला जन्म दिला. रिद्धिमा आणि नंतर पाठोपाठ रणबीरचा जन्म झाला. आता रिद्धिमाचंही लग्न वेळेत झालं. आता आलियासुद्धा आई होणार आहे. नीतू कपूर दुसऱ्यांदा आजी होणार आहेत. पण आपल्याप्रमाणे सुनेनंही सिनेमातून ब्रेक घ्यावा, असं त्यांना वाटतं का? हे लवकरच कळेल. आलिया भट्ट कपूर - आलियानं रणबीर कपूरसोबत (Alia-Ranbir marriage)लग्नगाठ बांधली असून आलियानेही 30 वयाच्या आत आई होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कपूर घराण्याचा इतिहास पुन्हा एकदा रिपीट होताना दिसतोय. कपूर सुनांनी वयाच्या 30 व्या वर्षाच्या आत आई होण्यावर भर दिला. बबिता, नितू पाठोपाठ आलियाही वयाच्या 30 व्या वर्षीच्या आत आई होणार आहे. आलियाचं वय आता 29 आहे.
  कपूर घराण्याच्या या परंपरेच्या विरोधात पहिल्यांदा त्यांच्या मुलींनी पाऊल उचललं. कपूर खानदानातल्या असूनही करिश्मा आणि करीनाने लग्नानंतर सिनेमातलं करिअर कायम ठेवलं. एवढंच नाही तर करीना कपूरने बाळ झाल्यानंतरही जोमाने काम सुरू ठेवलं. दुसऱ्या प्रेग्नन्सीनंतरही ती नव्या सिनेमांमध्ये काम करण्यास सज्ज आहे. आता आलियासुद्धा तेच करणार की बबिता आणि नीतू कपूर या सासवांचा कित्ता गिरवणार?
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Pregnancy

  पुढील बातम्या