करण जोहरच्या हातातली 'कठपुतली' म्हणणाऱ्यांना आलियानं दिलं सडेतोड उत्तर

आलियानं दिलेल्या अनेक सुपरहिट सिनेमांपैकी अनेक सिनेमे करण जोहरच्या बॅनरखाली बनलेले आहेत.

  • Share this:

सध्या एकामागोमाग एक यशाच्या पायऱ्या गाठणाऱ्या आलिया भटनं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र तिच्यावर अनेकदा ती करण जोहरच्या हातातली कठपुतली आहे अशी टीका केली जाते. असं म्हटलं जातं की, आलिया करणला विचारल्याशिवाय कोणताही सिनेमा साइन करत नाही.

करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयरमधून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या आलियानं आतापर्यंत हाइवे, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, कपूर अँड सन्स, उड़ता पंजाब, बद्रीनाथ की दुल्हनिया, राझी, गली बॉय हे सुपरहिट सिनेमे दिले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं तिला करण जोहरची कठपुतली म्हटलं जाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिनं करण जोहर या क्षेत्रातील माझा गुरू असल्याचं म्हटलं.

एखादी व्यक्ती तुमची गुरू तेव्हा असते जेव्हा ती तुमच्यापेक्षा सर्वच बाबतीत कैकपटींनी जास्त असते. त्यामुळे तुमच्यासाठी ती व्यक्ती सर्वात आधी येते. करणनं मला माझी पात्रता दाखवण्याची पहिली संधी दिली. त्यामुळे मी त्याचा खूप आदर करते आणि जर या गोष्टीसाठी मला त्याच्या हातची कठपुतली म्हटलं जात असेल तर मला अशी कठपुतली बनणं मान्य आहे. अशा शब्दात आलियानं टीकाकारंना सडेतोड उत्तर दिलं.

आलियानं सहा वर्षांत जवळपास सर्वच सुपरहिट सिनेमे दिले पण त्यातील अनेक सिनेमे हे करण जोहरच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेले आहेत. अशा आरोपावर आलिया सांगते की मला इतर अनेक दिग्दर्शकांनी काम दिलं आहे आणि त्या सिनेमांनाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे.

आलिया सध्या तिचा आगामी सिनेमा कलंकच्या प्रमोशन मध्ये व्यस्त असून या सिनेमात ती राजकुमारी रुपची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमाची निर्मितीसुद्धा करण जोहरच करत असून यात वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, माधुरी दीक्षित यांच्याही प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 09:24 PM IST

ताज्या बातम्या