मुंबई, 20 मार्च: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या फॅशन आयकॉन (Bollywood Fashion Icons) मानल्या जातात. त्यांचे विविध ड्रेसेसमधील फोटोज-व्हिडीओ व्हायरल होत असतात. या अभिनेत्री त्यांच्या फॅशन सेन्समुळे कधी-कधी ट्रोल देखील (Actress Got Trolled) होतात. अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt Video Viral) देखील प्रत्येक लुक चर्चेत असतो. दरम्यान 'गंगुबाई काठियावाडी' फेम या अभिनेत्रीचा जुना एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगांचा नेट असणारा गाऊन परिधान केला आहे.
हा गाऊन पाहिल्यानंतर लक्षात येते की असाच काहीसा दिसणारा गाऊन काही दिवसांपूर्वी बी-टाऊनमध्ये झालेल्या एका पार्टीत अभिनेत्री अन्यना पांडेने (Ananya Panday got trolled for her fashion) परिधान केला होता. त्यामुळे तिला ट्रोल देखील व्हावे लागले होते. शिवाय त्याआधी मलायका अरोराने (Malaika Arora) एका पार्टीत असाच सेम गाऊन कॅरी केला होता. दरम्यान व्हायरल झालेला आलियाचा व्हिडीओ 2018 मधला आहे. फोटोग्राफर Viral Bhayani ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जुन्या कलेक्शनमधील हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी हा व्हिडीओ 2018 मधला असल्याचे म्हटले आहे.
हे वाचा-Bachchhan Paandey ला 'पत्थर की आँख' मुळे भयंकर त्रास; डोळ्यांनी दिसणंही...
दरम्यान आलियाच्या या व्हिडीओनंतर चाहत्यांच्या नजरेतून या अभिनेत्रींचे हे सारखे दिसणारे आऊटफिट सुटले नाहीत. त्यांनी कमेंट करत याबाबत काही सवाल विचारले आहेत तर काहींनी ट्रोलही केले आहे. 'अनन्याने देखील सेम आऊटफिट कॅरी केला होता, हे लोकं आपल्या कपड्यांची अदलाबदली करतात का?' असा सवाल एका युजरने केला आहे. एकाने म्हटलं आहे की, 'फिल्म्स तर कॉपी करतात आता कपडे पण कॉपी करायला लागले आहेत.'
हे वाचा-'Meghan Markle सह शरीर संबंधाचा दावा करण्यासाठी मिळाली होती 53 लाखांची ऑफर'
एका युजरने असे म्हटले आहे की, 'सर्वजण सेम कपडे का घालत आहेत. बी-टाऊनला नव्य फॅशन डिझायनरची गरज आहे.' आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, 'पहिल्यांदा मलायकाने परिधान केला, नंतर अनन्याने आणि आता आलियाने. दुसरा कोणता ड्रेस नाही आहे का?' अशा असंख्य कमेंट्स आलियाच्या या व्हिडीओवर आल्या आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री अन्यना पांडे हिने धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्वा मेहता यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आलियाच्या या गाऊनप्रमाणेच ब्लॅक कलरचा नेटेड गाऊन कॅरी केला होता. त्यावेळी अनन्याला फार ट्रोल करण्यात आले होते. या मोनोकिनीसारख्या ड्रेसवर डिझाइन करण्यात आलेले नेट आहे. अनेक युजर्सनी ट्रोल करत या फॅशनला डिझास्टर म्हटले होते.
View this post on Instagram
तर मलायकाने अगदी या दोन्ही ड्रेसशी मिळताजुळता ड्रेस फरहान अख्तर-शिबानी दांडेकरच्या वेडिंग पार्टीमध्ये कॅरी केला होता. मलायका देखील यावेळी ट्रोलच झाली होती. असे कपडे घालून कोण लग्नाला जातं असेल सवाल तिला विचारण्यात आले होते.
View this post on Instagram
दरम्यान आलियाच्या या जुन्या व्हिडिओनंतर या अभिनेत्रींना मोनोकिनी आणि नेट गाऊनचं कॉम्बिनेशन असणाऱ्या या ड्रेसमुळे पुन्हा एकदा ट्रोल व्हावं लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Ananya panday, Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Malaika arora