मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लग्नात रणबीरला सासूबाईंनी दिलं इतक्या कोटींचं महागडं गिफ्ट

लग्नात रणबीरला सासूबाईंनी दिलं इतक्या कोटींचं महागडं गिफ्ट

बहुप्रतीक्षित आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची जोरदार चर्चा होती. 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 16 एप्रिल-   बहुप्रतीक्षित आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची जोरदार चर्चा होती. 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला. या लग्नाला काही मोजक्या बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती. आलिया आणि रणबीरची एक झलक पाहण्यासठी लोक उत्सुक होते. त्यांनतर या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो समोर आले आहेत.आलियाचं मंगळसूत्र आणि अंगठीनंतर आता रणबीरला त्याच्या सासूकडून खास भेटवस्तू मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या सुंदर फोटोंपासून इन्साईड स्टोरीपर्यंत अनेक आम्ही तुम्हाला सांगत आहोत. आलियाच्या मंगळसूत्र आणि लग्नाच्या अंगठीनंतर जाणून घ्या, रणबीरला त्याच्या सासरकडून कोणती खास भेट मिळाली आहे, ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे.

आलिया भट्टला लग्नामध्ये कपूर कुटुंबाकडून एक अनोखी हिऱ्याची अंगठी भेट म्हणून मिळाली आहे. तर आलियाने रणबीर कपूरला बँड दिला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, वर असणाऱ्या रणबीर कपूरला सासू सोनी राजदानकडून एक खास भेट मिळाली आहे. ज्याची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसेल. आलियाच्या आईने रणबीरला एक महागडा घड्याळ भेट दिला आहे. जो फारच रेअर आहे. ज्याची किंमत तब्बल 2.5 कोटी रुपये इतकी आहे.

सर्वसामान्य लोक असो किंवा सेलिब्रेटी आपल्या फॅमिली वेडींगमध्ये सर्व चालीरीती अगदी उत्साहाने पार पाडतात. म्हणूनच बहिणीचं लग्न व्हावं आणि बूट चोरण्याचा विधी नसावा, हे कसं होऊ शकतं. बॉलिवूडच्या या बहुप्रतिक्षित लग्नात बूट चोरण्याचा विधी पार पडला आणि त्याबदल्यात रणबीरच्या मेहुणींनी अशी मागणी केली की सर्वच चकित होतील. आलिया भट्टच्या गर्ल गँगने त्यांच्या दाजींना बूट परत करण्यासाठी 11.5 कोटी रुपयांची मागणी केली होती. पैशांवरून बराच वेळ मजामस्ती झाल्यानंतर अखेर त्यांना एक लाख रुपयांचा लिफाफा देण्यात आला.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor