• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Shershah पाहून सिद्धार्थ मल्होत्राला मिस करतेय आलिया; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'तू खूपच...'

Shershah पाहून सिद्धार्थ मल्होत्राला मिस करतेय आलिया; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'तू खूपच...'

आलियाने आपला एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीसाठी खास पोस्ट लिहीली आहे. याशिवाय चित्रपटाचंही खूप कौतुक केलं आहे.

 • Share this:
  मुंबई 15 ऑगस्ट : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)  आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा बहूप्रतिक्षित ‘शेरशाह’ (Shershaah) चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवसापासून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर सर्वत्र कौतुकही होत आहे. कारगील युद्धात शहिद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra) यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत अभिनेत्री आलिया भट्टनेही (Alia Bhatt) हा चित्रपट पाहिला. तर त्यानंतर तिने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. आलियाने आपला एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीसाठी खास पोस्ट लिहीली आहे. याशिवाय चित्रपटाचंही खूप कौतुक केलं आहे. तिने लिहीलं की, ‘या चित्रपटाने मला हसवलं, रडवलं आणि अनेक भावनांमधून नेलं. सिद्धार्थ तू खूप स्पेशल होतास या.. खूपच मुव्हींग. आणि माझी सुंदर कियारा अडवाणी, तू अशीच चमकत राहा. चित्रपटाच्या संपूर्ण कास्टला खूप शुभेच्छा. हा एक अतिशय सुंदर चित्रपट आहे.’

  राणू मंडललाही 'बचपण का प्यार'ची भुरळ; गाणं ऐकून युझर्स म्हणाले, 'गाते चांगलं...'

  आलिया आणि सिद्धार्थने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. 2012 साली आलेल्या या चित्रपटात वरुण धवन देखील होता. हा चित्रपट सुपहीट ठरला होता. त्यानंतर हे तीनही स्टार बॉलिवूडमध्ये नावारुपास आले. आलिया आणि सिद्धार्थची चित्रपटाच्या शुटींग दरम्यान चांगली मैत्री झाली होती. पण त्यानंतर काही वर्षांनी ते एकमेकांना डेट करू लागले होते.
  आलिया आणि सिद्धार्थने जाहीररित्या कधीही आपल्या नात्याचा खुलासा केला नाही. मात्र ते अनेकदा एकत्र स्पॉट व्हायचे. सिद्धार्थला भट्ट कुटुंबियांसोबतही स्पॉट केलं जात होतं. मात्र काही काळंनंतर आलिया आणि सिद्धार्थमध्ये दुरावे आले, व आलिया अभिनेता रणबीर कपूरला डेट करू लागली. आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्याही बातम्या येत आहेत.
  Published by:News Digital
  First published: