मुंबई, 05 मार्च: बॉलिवुडची बबली गर्ल आलिया भट्ट सध्या आपल्या नव्या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. बॉलिवुडची ही हॉट जोडी अनेक बॉलिवुडच्या इव्हेंटला एकत्रित कॅमेरासमोर येते. मात्र आता या जोडीचं नवं सिक्रेट समोर आल आहे. आलिया आणि रणबीर दोघही बिझी शड्युलमध्ये देखिल 24 तास एकत्र असल्याची चर्चा आहे. लग्नाआधीच हे दोघेही एकत्र राहत त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. ही जोडी एकत्र राहात असल्याचा ठोस पुरावा हाती आला आहे.
नुकत्याच झालेल्या ‘गिल्टी’ या शॉर्टफिल्मच्या स्क्रीनिंगसाठी आलिया गेली. या शॉर्ट फिल्ममध्ये आलियाची मैत्रीण आकांक्षा पाहायला मिळणार आहे. आपल्या मैत्रिणीच्या शॉर्ट फिल्मच्या स्क्रीनिंगसाठी आलिया गेली. या इव्हेंटचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आली. यामध्ये आलियाच्या मोबाइल फोनची झलक कॅमेरामध्ये कैद झाली आहे. ज्यात आलिया आणि रणबीरच्या नात्याचं आणखी एक गुपित समोर आलं आहे. आलियाच्या फोन स्क्रीनवर रणबीर आणि आलियाचा फोटो असल्याचं पाहायला मिळालं आहे.
रणबीर आणि आलियाचा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट येत्या 4 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात अभिताभ बच्चन, रणबीर, आलिया, नागार्जुन, डिंपल कपाडिया देखील पाहायला मिळणार आहेत.
अन्य बातम्या
Corona Virus पासून वाचण्यासाठी सलमाननं घेतला मोठा निर्णय, चाहत्यांना म्हणाला...
कार्तिकने स्टेजवर सर्वांसमक्ष कतरिनाचे पाय धरले; VIDEO पाहून समजेल कारण
PHOTOs मुलीच्या पूलसाइड बर्थडे पार्टीत 76 व्या वर्षी तनुजाने घातला स्विमसूट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aalia bhatt, Bollywood, Ranbir kapoor