मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia bhatt : रणबीरच्या वाढदिवशी आलियाला मिळाली गुड न्यूज; पटकावला मानाचा पुरस्कार

Alia bhatt : रणबीरच्या वाढदिवशी आलियाला मिळाली गुड न्यूज; पटकावला मानाचा पुरस्कार

Alia bhatt

Alia bhatt

नुकतंच भारतीय सिनेसृष्टीत मोलाचं योगदान दिल्याबाबत आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मानाचा असा स्मिता पाटील स्मृर्ती पुरस्कार जाहीर करण्यात झाला होता. आता त्यानंतर आलियाच्या कारकिर्दीत पुन्हा एकदा यशाचा तुरा खोवला गेला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 28 सप्टेंबर : 2022 हे वर्ष आलिया भट्टसाठी खूपच स्पेशल ठरलं. हे वर्ष अभिनेत्रीसाठी केवळ वैयक्तिकच नाही तर व्यावसायिक आघाडीवरही खूप खास आहे. आलियाला या वर्षात रणबीर कपूरच्या रुपात स्वप्नातील जोडीदार भेटला, त्यानंतर ती आता आई होणार आहे. त्याच वेळी, ती सध्या तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या दरम्यान, आलियासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. नुकतंच भारतीय सिनेसृष्टीत मोलाचं योगदान दिल्याबाबत आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मानाचा असा स्मिता पाटील स्मृर्ती पुरस्कार जाहीर करण्यात झाला होता. आता त्यानंतर आलियाच्या कारकिर्दीत पुन्हा एकदा यशाचा तुरा खोवला गेला आहे.

आज रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. यावेळी आलिया भट्टलाच  एक खास गुड न्यूज मिळाली आहे.  एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन आलियाने आपली खास ओळख निर्माण केली आहे. 'गंगूबाई काठियावाडी', 'आरआरआर', 'डार्लिंग्स'नंतर 'ब्रह्मास्त्र'मधील उत्कृष्ट अभिनयानंतर आलियाची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात आहे. आलियाने 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटातून हॉलिवूडमध्येही पाऊल ठेवले आहे. आता चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल या अभिनेत्रीला टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तिची टाईम 100 इम्पॅक्ट अवॉर्डसाठी निवड झाली आहे. आलियानं इन्स्टाग्राम स्टोरीवर पुरस्काराचं सन्मानपत्र शेअर करत ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे.

आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर टाईम मॅगझिनची पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. आलियाच्या योगदानाचे वर्णन करताना टाईमने लिहिले की, 'आलिया भट्टने तिच्या दमदार अभिनयामुळे आधुनिक स्त्रीची प्रतिमा मिळवली आहे.' आलियाच्या या  यशाबद्दल कळल्यावर तिची आई आणि वेट्रेन अभिनेत्री सोनी राजदानच्या आनंदाला पारावार उरला नाही. दिया मिर्झासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही तिचे अभिनंदन करत आहेत.

हेही वाचा - Alia-Ranbir: कन्स्ट्रक्शन साईटवर प्रेग्नंट आलियासाठी रणबीरने केलं असं काही; VIDEO जिंकेल तुमचं मन

आलिया बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना, आई सोनी राजदान यांनी अभिनंदनपर कमेंट केली आहे. चाहतेही आलियाचे जोरदार अभिनंदन करत आहेत. टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड सोहळ्यात हा सन्मान आलिया भट्टला देण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी सिंगापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Entertainment