VIDEO : अक्षय कुमारच्या ‘टिप-टिप बरसा पानी’वर आलिया भटचा हॉट डान्स

VIDEO : अक्षय कुमारच्या ‘टिप-टिप बरसा पानी’वर आलिया भटचा हॉट डान्स

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन गाणं ‘टिप-टिप बरसा पानी’ आजकाल सामान्य माणसांपासून ते अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जून : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचा सिनेमा ‘मोहरा’मधील गाणं ‘टिप-टिप बरसा पानी’ आजकाल सामान्य माणसांपासून ते अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे. सतत कोणी ना कोणी या गाण्यावर डान्स करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटला सुद्धा या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही. आलियानं तिच्या युट्यूब चॅनेलवर या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्री सुश्मिता सेनचा ब्रेकअप? स्वतःहून 15 वर्षांनी लहान मॉडेलला करत होती डेट

आलियानं तिच्या ट्विटर अकाउंटवर तिच्या यूट्यूब चॅनेलवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ‘टिप-टिप बरसा पानी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यासोबत या व्हिडिओमध्ये आलियानं तिच्या यूट्यूब चॅनेलचीही माहिती दिली आहे. हा व्हिडिओ शेअ करताना आलियानं काहीतरी नवं, गंमतीशीर आणि वेगळं असं यूट्यूबवर आहे असं कॅप्शन दिलं आहे. आलियाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूला मातृशोक, आई विजया निर्मला यांचं निधन

आलिया भटनं अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये तिची वेगळी जागा तयार केली आहे. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती एका मागोमाग एक बिग बजेट सिनेमा साइन करताना दिसत आहे. सध्या तिचं नाव बॉलिवूड मधील आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये घेतलं जात आहे. पण आगामी सिनेमांसोबतच आलियानं नुकतच तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं आहे. याची माहिती तिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत दिली होती.

 

View this post on Instagram

 

Something new, something fun, something on YouTube 🌞📽 Link in bio!

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

आलिया भट सध्या तिचा आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय ती लवकरच ती संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’चं शूटिंगही सुरू करणार आहे. यामध्ये ती सलमान खान सोबत दिसणार आहे.

रणवीर सिंहला मागे टाकत विकी कौशल बनला सॅम मानेकशॉ, पाहा फर्स्ट लुक

====================================================

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

First published: June 27, 2019, 1:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading