मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Bhatt Pregnancy : प्रेग्नेंट आलियानं नवरा रणबीरच्या गाण्यावर केला डान्स, करण जोहर म्हणाला...

Alia Bhatt Pregnancy : प्रेग्नेंट आलियानं नवरा रणबीरच्या गाण्यावर केला डान्स, करण जोहर म्हणाला...

alia bhatt

alia bhatt

आलिया भट्टचा एक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ फिल्ममेकर करण जोहरनं शेअर केला आहे. पाहा VIDEO

  मुंबई, 26 जुलै : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. आलियानं प्रेग्नेंसीची बातमी शेअर केल्यापासून ती सतत चर्चेत असते. आलियानं लग्नाच्या दोन महिन्यांनंतर सगळ्यांना गूडन्यूड दिली. अनेकांना या बातमीनं सुखद धक्काच बसलेला पहायला मिळाला. त्यानंतर तिच्यावर अनेक शुभेच्छा, कौतुकांचा वर्षाव पहायला मिळाला. अशातच आलियाचा एक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ फिल्ममेकर करण जोहरनं शेअर केला आहे. आलिया भट्टचा आगामी चित्रपट 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये तिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंह झळकणार आहे. या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर करणनं आलियाचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये सेटवर एक छोटंसं सेलिब्रेशन होत असलेलं पहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये रणवीर सिंह आणि सिनेमाची टीमही पहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये आलियानं रणबीरच्या चन्ना मेरेया गाण्यावर क्युट डान्सही केला. करण मेरी राणी म्हणत व्हिडीओ शूट करत होता. आलियाचा हा सिंपल लुक आणि गोड अंदाज चाहत्यांना भुरळ घालत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Karan Johar (@karanjohar)

  करणनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत असलेल्या पहायला मिळत आहे. 'आलिया मम्मी खूप क्युट दिसतेय, दिवसेंदिवस आलिया मॅच्युअर होत चालली आहे', अशा अनेक गोड प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटत असलेल्या पहायला मिळतायेत. आलियाचा प्रेग्नेंसी ग्लो दिवसेंदिवस वाढत चालल्याचा दिसत आहे. हेही वाचा -  Ananya Film: वर्ल्ड व्हिसिलिंग चॅम्पियननं 'अनन्या'ला दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO दरम्यान, आलियाच्या आगामी 'डार्लिंग' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यामुळेही ती जोरदार चर्चेत आहे. तिचे अनेक आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला तर येणारच आहे. याशिवया तिचं बाळंही लवकरच येणार आहे. आलियाचे चाहतेही तिच्या आगामी प्रोजेक्ट आणि बाळासाठी खूप उत्सुक आहेत.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Alia Bhatt, Bollywood, Instagram post, Karan Johar, Ranbir kapoor, Ranveer sigh, Viral video.

  पुढील बातम्या