'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल

'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल

अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट कलंक सध्या फारच चर्चेत आहे. सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा पसरत आहे. पाहा व्हिडिओ

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेली आलिया भट्ट 'कलंक' सिनेमामुळे बरीच चर्चेत आली आहे. 18 जानेवारीला सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून त्या दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लीक झाला आहे. आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असल्याने चित्रपटाचा शूटिंगचा शेवटचा टप्पा संपला आहे. शेवटच्या टप्प्यात गाण्याचं चित्रिकरण सुरू असताना आलियाचा डान्स करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. आलिया भट्टचा फॅन फॉलोव्हर्स प्रचंड असल्याने काही तासातच या व्हिडिओला हजारोच्या संख्येनं लाईक आणि कमेंट येऊ लागले.
 

View this post on Instagram
 

Another video of Alia bhatt Dance from the shoot of Kalank at Gwalior fort ❤️ Follow @ourgwalior for more


A post shared by Follow Back Please (@ourgwalior) on


या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट इतर डान्सर मुलींसोबत डान्स करताना दिसत आहे. आलियाच्या या गाण्याच्या व्हिडिओनंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यात सिनेमाच्या सेटवर ती हातात पतंग घेऊन उभी आहे. त्याचबरोबर 'कलंक' सिनेमातील या गाण्यामध्ये आलियाने घागरा-चोळी घातली आहे ज्यात फार छान दिसत आहे.
 

View this post on Instagram
 

@aliaabhatt on the sets of #kalank #gullyboy @aliaabhatt_fanss @aliabhatt_fc777 @jyothisharma_ @aliaabhatt_fangirl @welovealiabhatt @_cute_alia_bhatt @aliabhattmagics @aliaabhatt_official_account_ @aliabhattsquad @aliabhattgallery @aliabhatt_bae_ @aliabhattfc1 @aliabhattdimples @aliabhattdaily @aliabhattdiaries__ @aliaholicsx @cuty_kriti_aliaa_fc @priyagaikwad3890 @__aliaabhatt_fan_club @aliabhattsfeed @alia_bhaat_fc @alia_bhatt_fan_club_123 @aliaabhat143 @aliabhattgallery @aliabhattmagics @aliaabhat143 @shanaya_008 @welovealiabhatt @aliaabhattperfection @aliabhattsquad @aliabhattfanbase @alia_bhatt09 @aliabhattmedia @aliaholic____ @aliaholicsx @alia_fanclub08 @_aliaforever @aliafanbase @aliafever5 @aliafans_ @aliamemes @aliamyprincess @aliamagic @alia_my_love_ @aliamagics @_alia_malhotra @aliabhatt_bae_ @alia_my_world @aliaasfantasy @aliaasfapper @aliagolds #alia #aliabhatt #varundhawan #sidharthmalhotra #deepikapadukone #katrinakaif #dishapatani #shraddhakapoor #shaheenbhatt #anushkasharma #viratanushka #alia_bhatt_obsessed__ #kareenakapoor #srk #hrithikroshan #salmankhan #akansharanjan #mehgnagoyal #aliabhatt_bae_ #alia_my_world #raazi #stri #kiaraadvani #saraalikhan #kedarnath @officialsaraalikhan @saraalikkhan @saraalikhan095


A post shared by Alia❤ Kriti ❤Sara❤ (@alia_kriti_sara_obsessed) on


करण जोहर निर्मित आणि अभिषेक वर्मा दिग्दर्शित 'कलंक' सिनेमा येत्या 19 एप्रिलला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सिनेमात आलिया भट्टसोबत वरुण धवन, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमु अशी दिग्गज मंडळी असणार आहेत. आलिया भट्टच्या या व्हायरल व्हिडिओमुळे प्रेक्षकांमध्ये 'कलंक' चित्रपटाची उत्सुकता वाढत चालली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 04:01 PM IST

ताज्या बातम्या