मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया भट्टने लग्नात कॉपी केला कंगना रणौतचा लुक? VIRAL फोटोवरुन चर्चेला उधाण

आलिया भट्टने लग्नात कॉपी केला कंगना रणौतचा लुक? VIRAL फोटोवरुन चर्चेला उधाण

आलिया भट्ट ( Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. काल, 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला.बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.आणि ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 15 एप्रिल- आलिया भट्ट ( Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. काल, 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला.बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.आणि ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान कंगना रणौतचा   (Kangana Ranaut)  एक फोटो चर्चेत आहे. त्याचं कनेक्शन आलिया भट्टसोबत आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण? आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. आलियानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे.आलियानं ऑफ व्हाईट रंगाची साडी तर रणबीरनं देखील त्यालाच मॅच होणारी ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली आहे. आलियाच्या हातातील लाल चुडा हिऱ्यांची ज्वेलरी तिच्या सौंदर्यात भर टाकत आहे. आलियाचा हा लुक मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. परंतु आता आलिया-रणबीरच्या लग्नाच्या फोटोंमध्ये कंगना रणौतच्या एका फोटोची खूप चर्चा होत आहे. फोटो शेअर करताना यूजर्सनी आलिया भट्टच्या वेडिंग लुकची कंगनाच्या लुकशी तुलना करायला सुरुवात केली आहे. आलियाचा वेडिंग लूक कंगनाच्या एका लुकशी जुळत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. कंगना राणौतने तिचा भाऊ अक्षत राणौतच्या लग्नावेळी हा लुक कॅरी केला होता. सब्यसाचीने डिझाईन केलेला आलिया भट्टचा वेडिंग आउटफिट कंगना राणौतच्या लुकशी मिळताजुळता आहे. रंगापासून ते डिझाईनपर्यंत ही साडी एकसारखी दिसत आहे. विशेष म्हणजे कंगनाची ही साडीही सब्यसाचीनेच डिझाइन केली आहे. भाऊ अक्षतच्या लग्नानंतर कंगना राणौतने या आयव्हरी साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते आणि सोबतच सब्यसाचीला टॅगही केले होते.आता आलिया आणि कंगनाच्या साडीतील साम्य पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकजण असंही म्हणत आहेत की, आलियाने तिच्या या खास दिवसासाठी पोशाख निवडण्यापूर्वीरिसर्च का केला नाही? कंगना आणि आलियाचा लुक सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे.
First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Kangana ranaut

पुढील बातम्या