प्रेमासाठी काहीही: आलिया भट्टने रणबीरच्याच इमारतीमध्ये घेतलं घर; किंमत ऐकून तोंडात बोटं घालाल!

प्रेमासाठी काहीही: आलिया भट्टने रणबीरच्याच इमारतीमध्ये घेतलं घर; किंमत ऐकून तोंडात बोटं घालाल!

आलिया भट्टने (Alia Bhatt) रणबीर कपूर (Ranbir Kapoor) राहतो त्याच इमारतीमध्ये घर घेतलं आहे. घराची किंमत ऐकून तोंडात बोटं घालाल.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर: आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) जोडी आजकाल त्यांच्या सिनेमांपेक्षा अफेअरमुळेच जास्त चर्चेत असते. आलिया आणि रणबीर अनेक वर्षांपासून एकमकांना डेट करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात दोघंही एकमेकांसोबतच राहत होते. आता अशी बातमी समोर आली आहे की, ज्या बिल्डिंगमध्ये रणबीर राहत होता त्याच बिल्डिंगमध्ये आलियाने घर घेतलं आहे.

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, हे घर तब्बल 32 कोटींचं आहे. 2460 स्क्वेअर फीटचं हे घरं पाचव्या मजल्यावर आहे. तर रणबीरचं घर त्याच बिल्डिंगमध्ये 7व्या मजल्यावर आहे. तसंच आलियाची बहीण शाहीन भट्टही जुहू इथे राहायला आली आहे. आलिया लवकरच तिच्या नव्या घरामध्ये शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा आहेत. आलियाच्या एका जवळच्या मैत्रिणीने पिंक व्हिलाला दिलेल्या माहितीनुसार, आलियाने या नव्या घराच्या इंटिरिअरचं काम गौरी खानला दिलं आहे. शाहरुख खानची पत्नी गौरी खान एक उत्तम इंटिरिअर डिझायनर आहे. तिने आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींची घरं सजवली आहेत. आलियाने या नव्या घरात लक्ष्मीपूजन केलं असून यावेळी तिचे कुटुंबीय, रणबीर कपूर, करण जौहर, अयान मुखर्जी हे उपस्थित होते. विशेष म्हणजे आलियाचा जुहूमध्ये असंच एक घर असून त्याची किंमत 13 कोटींच्या घरात आहे. आलिया आता जुहूमधील 2 घरांची मालकीण झाली आहे.

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, आलिया आणि रणबीर ब्रह्मास्त्र या सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. आता हे कपल लग्नाच्या बेडीत अडकणार का? की रणबीर कपूरच्या आधीच्या अफेअर्सप्रमाणे आलियापासूनही तो वेगळा होणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 29, 2020, 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading