मुंबई, 2 डिसेंबर- बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या अनेक लव्ह बर्ड्सच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. विकी-कतरिनाप्रमाणेचं आणखी एक कपल यामध्ये टॉपला आहे. आणि ते म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि चॉकलेट बॉय रणबीर कपूर (Ranbir Kapoor). या दोघांच्या लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान असं काही घडलं कि दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमणात व्हायरल (Viral Video) होत आहे. पाहूया काय आहे हा नेमका व्हिडीओ.
बॉलिवूडमधील मोस्ट फेमस कपल म्हणून आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला ओळखलं जातं. या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना फारच आवडते. त्यामुळे यांच्या लग्नाची सर्वांचा आतुरतेने प्रतीक्षा आहे. मात्र लॉकडाऊनपासून अनेकवेळा यांचं लग्न पुढे ढकलल्याचा बातम्या समोर येत आहेत. या दोघांनी अजूनही याबद्दल अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. मात्र काही दिवसांपूर्वी अर्थातच रणबीर कपूरच्या वाढदिवसाला त्याला माय लाईफ म्हणत आलियाने आपलं नातं ऑफिशियल केलं होतं. त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चाना आणखीनच उधाण आलं होतं. हे दोघे अनेकवेळा सोबत व्हेकेशनचा आनंद घेतानाही दिसून येत आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नवरात्रीनिमित्त दुर्गामाताच्या पंडालमध्ये पोहोचले होते. त्यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कारणही तसेच आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक रंजक गोष्ट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया स्टेजवरून खाली उतरताना दिसून येते. यावेळी आलियाने जांभळ्या रंगाचा घेरदार लेहंगा घातला आहे. खाली उतरत असताना आलियाचा हा लेहंगा खाली स्टेजच्या फटीत अडकतो. त्याचवेळी पाठीमागून येणारा रणबीर कपूर आलियाचा हा लेहंगा आपल्या पायाने काढतो आणि पुढे टाकतो. हे पाहून आलिया अँग्री रिऍक्शन देताना दिसून येते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांचे चाहते आणि युजर्स यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. काहींनी रणबीर आणि अलियाच्या या इन्सिडेंसची खिल्ली उडवली आहे. तर त्यांच्या चाहत्यांनी याला क्युट कपल म्हटलं आहे.
(हे वाचा:कार्तिक आर्यनचं कोणासोबत सुरू आहे लपंडाव? अभिनेत्याने केला मोठा खुलासा)
आलिया आणि रणबीर गेली अनेक दिवस एकमेकांना डेट करत आहेत.काही वर्षांपूर्वी आलियाने रणबीर कपूर आपला क्रश असल्याचं म्हटलं होतं. त्यांनतर ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या सेटवर या दोघांमध्ये जवळीकता वाढली होती. तसेच हे दोघे एकमेकांना देत करू लागले होते. आता या दोघांच्या लग्नाची सर्वांनां उत्सुकता लागली आहे. आलिया भट्ट रणबीर कपूरच्या अनेक फॅमिली फंक्शनमध्ये दिसून येते. तसेच ऋषी कपूर यांच्या निधनासारख्या दुःखद वेळेतही ती रणबीर आणि त्याच्या कुटुंबियांसोबत दिसून आली होती. तसेच रणबीर कपूरही आलियाच्या फॅमिलीसोबत दिसून येतो. नुकताच आलियाचे वडील महेश भट्ट यांच्या वाढदिवसाला रणबीर कपूर उपस्थित होता. तसेच आलिया आणि रणबीर अनेकवेळा आपल्या नव्या घराच्या बांधकाम साईटवरसुद्धा एकत्र दिसून आले आहेत. आता चाहत्यांना याच्या लग्नाची तारीख जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Entertainment, Ranbir kapoor