Video- मीडियासमोर आलिया भट्टने केली वरुण धवनसोबत ही मस्ती

Video- मीडियासमोर आलिया भट्टने केली वरुण धवनसोबत ही मस्ती

ऑनस्क्रिन केमिस्ट्रीसोबतच त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीचेही लोक दिवाने आहेत. या दोघांचं एकमेकांसोबतचं नातं एवढं घट्ट आहे की दोघं कुठेही एकमेकांची मस्करी करू शकतात.

  • Share this:

मुंबई, ०५ एप्रिल- आलिया भट्ट आणि वरुण धवनने बी- टाउनमध्ये एकाच सिनेमातून एण्ट्री घेतली. 'स्टुडंट ऑफ दी इअर' सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. तेव्हा पासून आतापर्यंत दोघं अनेक सिनेमात एकत्र दिसले. दोघांमधला बॉण्डही त्यांच्या चाहत्यांना आवडतो. ऑनस्क्रिन केमिस्ट्रीसोबतच त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीचेही लोक दिवाने आहेत. या दोघांचं एकमेकांसोबतचं नातं एवढं घट्ट आहे की दोघं कुठेही एकमेकांची मस्करी करू शकतात. नुकताच असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

त्याचे झाले असे की, वरुण आणि आलिया सध्या त्यांच्या आगामी कलंक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. एका प्रमोशनल कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघं मीडियाला पोज देताना दिसत आहेत. यावेळी आलिया मस्ती करताना अचानक आपले पाय उंचावून उभी राहते. तिला वरुणच्या उंची एवढं व्हायचं होतं पण ते शक्य नसल्याने तिने पाय उंचावणंच योग्य समजलं.

सुरुवातीला वरुणला काही कळलं नाही. पण नंतर त्याने आलियाला असं करताना पाहिलं आणि आलियाकडे पाहून हसला. आलियालाही तिच्या या प्रयत्नांवर हसू आलं. आलियाला पाय उंचावून उभं राहताना पाहिल्यावर वरुणनेही तसंच केलं ज्यामुळे तो आलियापेक्षा अजून उंच झाला.

यानंतर आलिया आणि वरुणने हसत कॅमेऱ्यांना फोटो दिले आणि नंतर ते निघून गेले. त्या दोघांना एकमेकांसोबत एवढं कॅज्युअल पाहून त्यांची सिनेमांमधली केमिस्ट्री एवढी चांगली का असते याचा अंदाज लागू शकतो. येत्या १७ एप्रिलला त्यांचा आगामी कलंक सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात वरुण- आलियासोबत संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

VIDEO : आढळराव पाटील आणि गिरीश बापटांच्या भेटीबद्दल अमोल कोल्हे म्हणतात...

First published: April 5, 2019, 7:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading