मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'रॉकी और रानी कि प्रेम कहानी' मध्ये नसणार Kissing सीन! आलिया-रणवीरने 'या' कारणाने घेतला हा निर्णय

'रॉकी और रानी कि प्रेम कहानी' मध्ये नसणार Kissing सीन! आलिया-रणवीरने 'या' कारणाने घेतला हा निर्णय

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चे शूटिंग सध्या दिल्लीत सुरू आहे. या चित्रपटात आलिया भट्ट  (Alia Bhatt) आणि रणवीर सिंगची  (Ranveer Singh) जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

  मुंबई, 5 डिसेंबर- 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'    (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)  चे शूटिंग सध्या दिल्लीत सुरू आहे. या चित्रपटात आलिया भट्ट   (Alia Bhatt)  आणि रणवीर सिंगची   (Ranveer Singh)  जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे करण जोहर दीर्घ काळानंतर दिग्दर्शनात परतत आहे. चित्रपटाची स्टोरी लाईन ही एक प्रेमकथा आहे, मात्र चित्रपटात एकही लिप-लॉक आणि बोल्ड सीन दिसणार नसल्याचे बोलले जात आहे. कारण आलिया भट्ट आणि रणवीर सिंगने स्वतः हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आलिया-रणवीर करणार नाहीत लिपलॉक- जर तुम्ही आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' बद्दल विचार करत असाल कि यात ते 'गली बॉय' सारखे शुद्ध रोमँटिक सीन पाहायला मिळतील. तर ही बातमी तुम्हाला निराश करू शकते. . TOI च्या मते, असे होऊ शकते की तुम्हाला 'रॉकी और रानी की लव्ह स्टोरी' मध्ये रणवीर आणि आलियाचे कोणतेही किसिंग सिन दिसणार नाहीत. हा निर्णय घेतल्यानंतर नेमके काय झाले असा प्रश्न लोकांच्या मनात आला. रिपोर्टनुसार, दोघांनीही आपल्या पार्टनर्सबाबत हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आलिया आणि रणबीर कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दुसरीकडे, रणवीर सिंग देखील दीपिका पदुकोणमुळे पडद्यावर रोमान्स करताना अस्वस्थ आहे.मात्र चाहत्यांना या युक्तिवादावर विश्वास ठेवणे थोडे कठीण जात आहे. कारण रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या 'गली बॉय' चित्रपटात खूप रोमँटिक सीन्स दिले आहेत. दोघांचे पडद्यावर किसिंग सिन दिसले होते.रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्या दिल्लीत दीर्घ शेड्युलमध्ये सुरू आहे. (हे वाचा:धर्मेंद्र यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या टीमसोबत शेअर केला ... ) रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत सुरू आहे. अलीकडे सोशल मीडियावर रणवीर सिंग आणि आलिया भट्टचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही कुतुबमिनारजवळ धावत आणि पोज देताना दिसले होते.त्याच वेळी, करण जोहर, फराह खान आणि मनीष मल्होत्रा ​​यांनी चित्रपटाच्या सेटवरील BTS व्हिडिओ-फोटो देखील शेअर केले होते.'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Alia Bhatt, Entertainment, Ranveer sigh

  पुढील बातम्या