मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया नाही तर रणबीरसोबत असलेल्या या मुलीवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा; नेमकी आहे तरी कोण ?

आलिया नाही तर रणबीरसोबत असलेल्या या मुलीवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा; नेमकी आहे तरी कोण ?

Ranbir Kapoor and Alia Bhatt

Ranbir Kapoor and Alia Bhatt

बॉलीवूडमध्ये रणबीर कपूर (ranbir kapoor) आलिया भटसोबत (Alia Bhatt) असलेल्या रिलेशनशीपमुळं (Ranbir Alia Relationship) एकीकडे त्यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे तर दुसरीकडे एका इव्हेंटमध्ये रणबीरसोबत सहभागी झालेल्या एका मुलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 25 मार्च: बॉलीवूडमध्ये रणबीर कपूरआलिया भटसोबत (Alia Bhatt) असलेल्या रिलेशनशीपमुळं (Ranbir Alia Relationship) एकीकडे त्यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे तर दुसरीकडे त्यांचा ब्रम्हास्त्र (Brahmastra) चित्रपटही लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. दोघेही कुठे बाहेर सोबत दिसले की मीडियाचे कॅमेरे आपोआप त्यांच्याकडे वळतात. नुकतेच रणबीर आणि आलिया एका इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एका लहान मुलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

एका इव्हेंटमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाले. पण, यावेळी लोकांच्या नजरा त्यांच्यासोबत दिसणार्‍या एका लहान मुलीवर खिळल्या. ही मुलगी कोण आहे? याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली.

ही मुलगी कोणी आउटसायडर नसून रणबीर कपूरची भाची (Niece) समारा सहानी (Samara Sahni) आहे. जेव्हा रणबीर आणि आलिया समारासह कॅमेरामन्सना सामोरे गेले तेव्हा अचानक खूप कॅमेरे पाहून ती लाजली. तिचं ते लाजणं पाहून अनेकांनी तिची तुलना मामा रणबीर कपूरशी केली.

समाराचे आलिया-रणबीरसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी त्यावर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला. 'इतकी लाजणारी ही लहान मुलगी कोण आहे?', अशा प्रश्न एका सोशल मीडिया युजरनं विचारला आहे. तर एकानं म्हटलं आहे, रिद्धिमाची मुलगी खूप गोंडस आहे आणि ती एकदम रणबीरसारखी दिसते. एका युजरनं कमेंट केली आहे की, 'समारामध्ये बालपणीच्या रणबीरची झलक दिसते.' अनेकांनी मामा-भाची सारखे दिसतात, असं म्हटलं आहे.

समारा सहानी सध्या 11 वर्षांची असून ती रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor) आणि भरत सहानी (Bharat Sahni) यांची मुलगी आहे. गेल्यावर्षीचं तिनं इन्स्टाग्रावर अकाउंट सुरू करून सोशल मीडियावर डेब्यू केला होता. तेव्हा कपूर फॅमिलीतील सर्वांनी कमेंट्स करून तिचं सोशल मीडियावर स्वागतही केलं होतं.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor