मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding-करिना कपूर ते शाहीन भट्ट, खास गेटअपमध्ये लग्नात सहभागी झाले कुटुंबीय

Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding-करिना कपूर ते शाहीन भट्ट, खास गेटअपमध्ये लग्नात सहभागी झाले कुटुंबीय

अवघ्या काही वेळात बॉलिवूड   (Bollywood Wedding)  अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर   (Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding)  लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणारा हा सोहळा आज अखेर पार पडणार आहे. आलिया आणि रणबीरच्या लग्नासाठी दोघांचे कुटुंबीय, जवळचे मित्र यायला सुरुवात झाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 एप्रिल-  अवघ्या काही वेळात बॉलिवूड   (Bollywood Wedding)  अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर   (Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding)  लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणारा हा सोहळा आज अखेर पार पडणार आहे. आलिया आणि रणबीरच्या लग्नासाठी दोघांचे कुटुंबीय, जवळचे मित्र यायला सुरुवात झाली आहे.

अगदी खास लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नासाठी पाहुणे पोहोचले आहेत. इन्स्टंट बॉलिवूड आणि विरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

अभिनेत्री करिना कपूर आपल्या भावाच्या लग्नाला पती सैफसोबत पोहोचली आहे. करिनाने साडी तर सैफने पिंक अँड व्हाईट कुर्ता पजामा घातला आहे.

त्यांनतर आलिया भट्टची आई आणि बहीण सोनी राजदान आणि शाहीन भट्टसुद्धा आलेल्या आहेत.

आलियाचे वडील महेश भट्ट आणि सावत्र बहीण पूजा भट्टसुद्धा पोहोचल्या आहेत.

आलियाला आपली लेक मानणारा करण जोहरसुद्धा पिंक शेरवानीमध्ये दिसून आला. तर सिल्व्हर कलर शेरवानीमध्ये आयान मुखर्जीसुद्धा उपस्थित आहे.

रणबीर कपूरची आई आणि बहीण नीतू आणि रिद्धिमासुद्धा खास अंदाजात तयार झाल्या आहेत.

तर शम्मी कपूर यांच्या पत्नी नीलादेवी कपूर यासुद्धा पोहोचल्या आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Ranbir kapoor