मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीरनं बांधली लग्नगाठ; समोर आला पहिला फोटो

Alia Ranbir Wedding : आलिया-रणबीरनं बांधली लग्नगाठ; समोर आला पहिला फोटो

Alia Ranbir Wedding : आज, 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला.  लग्नानंतर या दोघांचा पहिला फोटो समोर आला आहे.

Alia Ranbir Wedding : आज, 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला. लग्नानंतर या दोघांचा पहिला फोटो समोर आला आहे.

Alia Ranbir Wedding : आज, 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला. लग्नानंतर या दोघांचा पहिला फोटो समोर आला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 14 एप्रिल- Alia Ranbir Wedding : आलिया भट्ट ( Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची सद्या सगळीकडे चर्चा आहे. आज, 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला. या लग्नाला काही बॉलिवूड सेलेब्सनी हजेरी लावली होती. आलिया आणि रणबीरची एक झलक पाहण्यासठी उत्सुक होते. आता या दोघांच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत. आलियानं तिच्या इन्स्टाला लग्नाचे फोटो शेअर केले आहोेत. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.  दोघांच्यावर चाहत्यांसह सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आलिया भट्टनं काही वेळापूर्वीच तिच्या इन्स्टाला लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दोघांचाही रॉयल लूक सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे. चाहत्यांसह सेलब्सकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मेहंदी समारंभाला बॉलिवूड कलाकारांनी लावली होती हजेरी

आलिया भट्टच्या आणि रणबीरचा मेहंदी समारंभ काल पार पडला आहे. 13 एप्रिल रोजी एक विशेष पूजा आणि मेहंदी समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये भट्ट कुटुंब आणि कपूर कुटुंबासह निवडक बॉलिवूड लोक उपस्थित होते. त्यांनतर आज म्हणजेच 14 एप्रिलला सकाळी हळद, चुडा सोहळा व लग्नाच्या विधी पार पडल्या.

वाचा-स्वतः च्या लग्नात आलिया भट्टसाठी फक्त बर्गर, पण रणबीरसाठी 'ही' खास डिश

ग्रँड रिसेप्शनचे आयोजन

लग्नानंतर आता आलिया आणि रणबीरनं एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केली असल्याची चर्चा. ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी पोहोचणार आहेत. 17 एप्रिल रोजी हे रिसेप्शन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असून, त्यामध्ये इंडस्ट्रीतील सर्व लोकांना आमंत्रणे पाठवली जाणार आहेत.

अशी आहे आलिया-रणबीरची लव्हस्टोरी

आलिया आणि रणबीर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.बॉलिवूडमधील या प्रसिद्ध जोडीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आलिया ११ वर्षांची असल्यापासूनच रणबीर कपूर तिला आवडत असल्याचं तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली असताना पहिल्यांदा आलियाने रणबीरला पाहिले.तेव्हा रणबीर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमादरम्यान आलियाने रणबीर सोबत लग्न करण्याची इच्छा देखील बोलून दाखविली होती. यानंतर अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे . एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर आलियाने गेल्याच वर्षी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रणबीरसाठी खास पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हापासून हे दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. शेवटी या क्यूट कपलनं आज लग्नगाठ बांधली आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood News, Entertainment, Ranbir kapoor