मुलगा पसंत आहे, आलियाच्या आईनं दिली प्रतिक्रिया!

मुलगा पसंत आहे, आलियाच्या आईनं दिली प्रतिक्रिया!

सोनी राझदानसाठी रणबीर हा 'लव्हली लव्हली बाॅय' आहे.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : 'नितूला आवडते, मला आवडते, रणबीरला आवडते, समजलं?' काही दिवसांपूर्वी ऋषी कपूरनं म्हटलं होतं. आम्हाला तर कळलंच, पण आता नवी प्रतिक्रिया आलीय आलियाची आई, सोनी राझदानकडून.

सोनी राझदानसाठी रणबीर हा 'लव्हली लव्हली बाॅय' आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना आलिया-रणबीरबद्दल जी चर्चा  किंवा अफवा आहे त्याबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या, 'मी माझ्या मुलीशी थेट बोलू शकते.'

त्या पुढे म्हणाल्या, ' माझं आणि माझ्या मुलीचं नातं खूपच चांगलं आहे. मला अफवांकडे लक्ष द्यायची गरज नाही. मी थेट बोलू शकते. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे मला माहीत असतं. शेवटी ते तिचं जीवन आहे. तिला हवं तसं जगू द्यायला हवं. तिचे निर्णय ती स्वत: घेते.'

शनाया अमेरिकेत, राधिका कोमात, नवा ट्विस्ट काय साधणार?

सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णीची खुलणार केमिस्ट्री

करण जोहरकडे स्वयंपाक करायची आई, केबीसीच्या हाॅट सीटवर महाराष्ट्राचे दीपक भोंडेकर

ऋषी कपूर यांच्या वक्तव्यावर त्या म्हणाल्या, 'आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ते मनमोकळं बोलतात. मी त्यांच्या बरोबर काम केलंय. मी नितू आणि रणबीरला ओळखते. रणबीर एकदम छान मुलगा आहे.'

एकूणच तुमच्या लक्षात येतंय का, भट्ट आणि कपूर दोन्ही कुटुंब आपल्या मुलांच्या पसंतीवर खूश आहेत.

मध्यंतरी, रणबीरनं या शोमध्ये करणला विचारलं, 'जर तुम्ही तुमच्या पहिल्या रिलेशनशिपमध्ये एक चूक करता आणि तीच चूक पुन्हा तुम्ही दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये देखील करता तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे ?'

यावर करणनं ताबडतोब उत्तर दिलं, 'तुम्ही त्या नात्यातून लगेच बाहेर पडायला पाहिजे. तुम्ही एकच चूक नेहमी करत असाल, तर तुमच्यात काही कमतरता आहे. तेव्हा वेळीच सावध व्हायला हवं.'

त्यानंतर रणबीरनं विचारलं, ' तू माझ्या गर्लफ्रेंडला काय सल्ला देशील?' यावर करण म्हणाला, 'तू जगातला सर्वात बेस्ट नवरा आहेस. आणि हा सल्ला मी तुझ्या गर्लफ्रेंडला कधीच दिलाय.'

म्हणजे हे नक्की की रणबीरला गर्लफ्रेंड आहे आणि आलियाशिवाय ती दुसरी कोणी असणं शक्य नाहीय. त्यामुळे करणनं आधीच हा सल्ला देऊन टाकलाय तर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 03:11 PM IST

ताज्या बातम्या